शाहदरा शरीफमधील कुंडा टोपा भागात सोमवार रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सरकारी कर्मचारी मोहम्मद रजाक मारला गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाकिस्तानी अबू हमजा यांचे छायाचित्र जाहीर करून त्याच्या विरोधात लूकआउट नोटीस जाहीर केली आहे. हमजावर १० लाखांचे बक्षी घोषित केले आहे. या दरम्यान पोलिसांनी चार कामगारांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू हमजा यांची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त राखले जाईल. हमजा हा थन्नामंडी शाहदरा शरीफ भागात सक्रिय आहे. सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, शाहदरा शरीफमध्ये ज्या दहशतवाद्यांनी या जवानावर हल्ला केला, त्यांना या जवानाची संपूर्ण माहिती होती. तो कधी स्वतःच्या घरी जातो, वगैरे माहिती सर्वांना होती. म्हणजे काही स्थानिक लोकांनी किंवा दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनी ही माहिती दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवल्याचे म्हटले जात आहे.
दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाने मंगळवारी शोधमोहीम सुरू केली होती. शेजारच्या घरांतही चौकशी केली जात आहे. मात्र कोणीही दहशतवादी त्यांच्या हातात आलेला नाही. सुरक्षा दलाने शाहदरा शरीफ यांच्या जंगी परिसरात शोधमोहीम राबवण्यासह राजोरी, बफ्लियाज, थन्नामंडी, मुघल रस्त्यांवरही नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली.
हे ही वाचा:
कोरियामध्ये मशीद बांधण्याच्या माजी के-पॉप स्टार दाऊद किमच्या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध
‘जिथे हिंसाचार झाला तिथे निवडणुकांना परवानगी नाही’
भगवान रामाचा फोटो असलेल्या प्लेटमधून बिर्याणीची विक्री?
सिद्धरामय्या यांनी घेतली नगरसेवक हिरेमठ यांची भेट
गेल्या दोन वर्षांत सातत्याने दहशतवादी हल्ले
गेल्या दोन वर्षांत राजोरी-पुंछ जिल्ह्यांत पुन्हा दहशत पसरवण्यासाठी दहशतवादी हल्ले होत आहेत. १ जानेवारी २०२३ रोजी राजोरीमधील ढांगरी भागात दहशतवाद्यांनी सात हिंदूंची निर्घृण हत्या केली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात राजोरीतील केसरी हिल परिसरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराचे पाच कमांडो हुतात्मा झाले होते. दहशतवाद्यांनी पुंछमधील भाटादूडियामध्ये एप्रिल, २०२३मध्ये लष्कराच्या गाडीवर हल्ला केल्यामुळे पाच जवान शहीद झाले होते. तर, गेल्या वर्षी पुंछमधली टोपा पीर भागात गेल्या वर्षी २२ डिसेंबर रोजी लष्कराच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात चार जवान शहीद झाले होते.