26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरदेश दुनियालंडनच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

लंडनच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

लॉर्ड मेयर ऑफ लंडन यांनी बोलून दाखविली इच्छा

Google News Follow

Related

महाराष्ट्र आणि लंडन मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत बैठकही घेतली. यावेळी राज्यातील इतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांविषयी चर्चा झाली.

या बैठकीत मिलेनी यांनी लंडनमधील आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा मानस व्यक्त केला. मिलेनी यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करतानाच लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस ब्रिटीश उपउच्चायुक्त हरजिंदर कांग, हेन्री ली, अभिजीत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण, स्वच्छ हवा, आर्टीफिशिअल इंटिलिजन्स, माहिती तंत्रज्ञान याबाबत सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र आणि लंडनमधील संबंध दृढ असून ते अधिक वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; गाड्या पेटवल्या, एकाचा मृत्यू!

‘सूर्यकुमार यादवमुळे मुलाचे पदार्पण पाहू शकलो’

‘ती माझी चूक होती’

‘हिंसेला माफी नाही, कोणतीही हिंसा अस्वीकारार्ह’

महाराष्ट्रात गुंतवणुकीला मोठा वाव असून भव्य पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ असल्याने उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दर्शविल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुंबई कोस्टल रोड, अटलसेतू सारखे पायाभूत सुविधांचे प्रकल्प गेमचेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी अटल सेतूवरून प्रवास केल्याचा अनुभव कथन करतानाच तो भव्य आणि दर्जेदार असल्याचे मिलेनी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा प्रेरणादायी आहे. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देतानाच लंडनमधील आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याच मानस मिलेनी यावेळी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा