चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन, कोविड केसेस पुन्हा वाढल्या

चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन, कोविड केसेस पुन्हा वाढल्या

कोविड-१९ ची मायभूमी असलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोविड-१९ चा उद्रेक झालेला आहे. या नवीन उद्रेकानंतर चीनने शाळा बंद केल्या आहेत, शेकडो उड्डाणे रद्द करणे आणि मोठ्या प्रमाणात चाचण्या घेणे सुरू केले आहे.

कोविड केसेस आणि त्यामुळे उद्भवणारे मृत्यू कमी होत असल्यामुळे इतर देशांनी निर्बंध कमी केले आहेत, तर चीनने सीमा बंद केल्या आहेत. लॉकडाऊन कायम ठेवले आहेत.

केसेसची संख्या कमी होती, परंतु सलग पाचव्या दिवशी देशात नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात आल्यामुळे अधिकाऱ्यांनी कोविड प्रोटोकॉल वाढवले आहेत.

सर्वात अलीकडील उद्रेक एका वृद्ध जोडप्याशी जोडला गेला आहे जो अनेक पर्यटकांच्या गटात होता. झियान, गांसु प्रांत आणि मंगोलियाला जाण्यापूर्वी त्यांनी शांघायमधून पर्यटनाला सुरुवात केली होती.

डझनभर नवीन प्रकरणे प्रवासाशी जोडली गेली आहेत, ज्यामध्ये बीजिंगसह कमीतकमी पाच प्रांतांमध्ये जवळचे संपर्क आहेत. कोविड केसेसमध्ये वेगाने वाढ होत असताना प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर चाचणी सुरू केली आहे आणि प्रभावित भागात पर्यटन स्थळे, शाळा आणि मनोरंजनाची ठिकाणे बंद केली आहेत.

हे ही वाचा:

करी रोडमधील अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

प्रभावित क्षेत्रातील विमानतळांनी शेकडो उड्डाणे रद्द केली आहेत तर काही स्थानिक प्रशासनाने त्यांच्या नागरिकांना विनाकारण बाहेर न जाण्यास सांगितले आहे.

दरम्यान, उत्तर चीनच्या मंगोलिया स्वायत्त प्रदेशात गुरुवारी सकाळी १० ते शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत १५ स्थानिक पातळीवर अनेक कोविड -१९ प्रकरणे नोंदवली गेली.

Exit mobile version