भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात पोहोचले आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला गेले आहेत. यावेळी पाकिस्तान एससीओ परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. त्यामुळे या बैठकीत सहभागी होण्यासाठी सदस्य देश पाकिस्तानात पोहोचले आहेत. एससीओची ही २३ वी बैठक असून इस्लामाबाद येथे होत आहे. दरम्यान, भारतीय परराष्ट्रीय मंत्र्यांचा हा दौरा देखील तेवढाच विशेष आहे, कारण तब्बल ९ वर्षानंतर भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला भेट देत आहे.
पाकिस्तानमध्ये १५-१६ ऑक्टोबर रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद होणार आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सर्व सदस्य देशांचे सरकारी नेते परिषदेत सहभागी होण्यासाठी इस्लामाबादला पोहोचले आहेत. भारताच्या वतीने मात्र पंतप्रधान मोदींच्या जागी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर परिषदेत सहभागी होण्यासाठी इस्लामाबादला पोहोचले आहेत. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत मंत्री जयशंकर २४ तासांपेक्षा कमी काळ पाकिस्तानमध्ये राहणार असल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानला जाण्यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारत या प्रभावशाली प्रादेशिक गटाच्या विविध यंत्रणांशी सक्रियपणे संलग्न आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्रमंत्र्यांचा जवळपास दशकभरातील हा पहिला दौरा आहे. पाकिस्तान १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी एससीओ कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंटची दोन दिवसीय बैठक आयोजित करत आहे.
हे ही वाचा :
विधानसभा निवडणूक म्हणजे मौका…’हिंदूविरोध्यांना गाडण्याचा अन वोट जिहादला झटका देण्याचा’
८.३० ला मतमोजणी सुरू होते पण ८.१० ला लीड कसे दाखवता?
मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची रणनीती, ‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’
‘पंतप्रधान मोदी आले असते तर बरे झाले असते, आज आम्ही सर्वांकडून भीक मागत आहोत’
९ वर्षांनंतर प्रथमच भारतीय परराष्ट्र मंत्री
गेल्या ९ वर्षात पहिल्यांदाच भारतीय परराष्ट्र मंत्र्याने पाकिस्तानला भेट दिली आहे. यापूर्वी २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री म्हणून पाकिस्तानला भेट दिली होती.
पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन
दरम्यान, दोन दिवसीय एससीओ बैठकीच्या पार्शभूमीवर इस्लामाबादमध्ये कडक लॉकडाऊन आहे. सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. अनेक देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. पाकिस्तान सरकारने सोमवारपासूनच तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. या काळात शाळा आणि व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत.
Landed in Islamabad to take part in SCO Council of Heads of Government Meeting. pic.twitter.com/PQ4IFPZtlp
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 15, 2024
#WATCH | EAM Dr S Jaishankar arrives in Rawalpindi, Pakistan for the 23rd Meeting of SCO Council of Heads of Government.
(Source: PTV) pic.twitter.com/BMIxwWWINk
— ANI (@ANI) October 15, 2024