कोरियामध्ये मशीद बांधण्याच्या माजी के-पॉप स्टार दाऊद किमच्या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध

कोरियामध्ये मशीद बांधण्याच्या माजी के-पॉप स्टार दाऊद किमच्या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध

दक्षिण कोरियन यूट्यूबर आणि माजी के-पॉप स्टार दाऊद किमच्या इंचॉनमध्ये मशीद बांधण्याच्या प्रयत्नाला स्थानिकांच्या विरोधाचा आणि फसवणुकीच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. सन २०२०मध्ये इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्याने स्वतःचे नाव जे किम ऐवजी दाऊद किम ठेवले होते. मशीद बांधण्याचा हा त्याचा दुसरा प्रयत्न आहे.

दाऊद किम याच्या युट्युब अकाऊंटचे ५५ लाख ५० हजार सदस्य आहेत. दाऊदने इंस्टाग्रामवर शेअर केले की त्यांना दक्षिण कोरियामध्ये मुस्लिमांसाठी प्रार्थना करण्याकरिता आणखी ठिकाणे तयार करायची आहेत. द कोरिया हेराल्डच्या म्हणण्यानुसार, त्याने त्याच्या चाहत्यांना या प्रकल्पासाठी आर्थिक मदत करण्यास सांगितले होते.

तथापि, राजधानी सोलमधील इंचॉनमध्ये मशीद बांधण्याच्या दाऊद किमच्या महत्त्वाकांक्षी योजनेला जमिनीचा करार संपुष्टात येणे, प्रशासकीय अडथळे, फसवणुकीचे आरोप आणि स्थानिकांकडून विरोध यांसह अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

सन २०१५च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार दक्षिण कोरियाच्या पाच कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ५६ टक्के लोक अधार्मिक आहेत. तर, त्यामागोमाग प्रोटेस्टंट (१९%), त्यानंतर कोरियन बौद्ध (१५.५%) आणि कॅथलिक (८%) आहेत. देशात अंदाजे दीड लाख मुस्लिम राहतात. त्यापैकी, सुमारे एक लाख २० हजार श्रमिक असून ते प्रामुख्याने उझबेकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि पाकिस्तानमधील आहेत. तर, ३० हजार विद्यार्थी आणि व्यापारी आहेत.

दाऊद किमने इंचॉनमध्ये मशिदीसाठी जमीन खरेदी केल्याचे जाहीर करूनही, जमिनीच्या पूर्वीच्या मालकाने करार रद्द करण्याची विनंती केली होती. प्रार्थनास्थळामुळे त्यांच्या मालमत्तेचे अवमूल्यन होईल, या भीतीने परिसरातील रहिवाशांनी मशिदीच्या योजनेला विरोध केल्यानंतर हे घडले. ‘मी रिअल इस्टेट एजंटला करार संपुष्टात आणण्यास सांगितले,’ असे पूर्वीच्या मालकाने योनहाप न्यूजटीव्ही या कोरयाच्या वृत्तवाहिनीला सांगितले.

द कोरिया हेराल्डच्या म्हणण्यानुसार किमच्या प्रस्तावित मशिदीच्या जागेजवळील गैर-मुस्लिम कोरियन रहिवासी या मशिदीच्या विरोधात होते. या मशिदीमुळे परिसरातील घरांच्या किमती कमी होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

शिवाय, यासमोर प्रशासकीय अडथळेही आहेत. धार्मिक सभेचे ठिकाण बांधण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वपरवानगी मिळालेली नाही, असेही समजते. स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आलेल्या वृत्तात मशिदीच्या जागेकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या परिस्थितीमुळे परवानगी नाकारण्यात आली, असे नमूद करण्यात आले आहे. इंचॉनमध्ये मशीद बांधण्याचा हा दाऊदचा पहिला प्रयत्न नाही. त्याने डेगू येथेही मशीद उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी त्याला आक्षेप घेतला होता.

हे ही वाचा:

‘जिथे हिंसाचार झाला तिथे निवडणुकांना परवानगी नाही’

भगवान रामाचा फोटो असलेल्या प्लेटमधून बिर्याणीची विक्री?

सिद्धरामय्या यांनी घेतली नगरसेवक हिरेमठ यांची भेट

कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याचा दावा; मुलीची हत्या ही ‘केरळ स्टोरी’ प्रमाणेचं!

दाऊद किम याच्यावर आर्थिक फसवणुकीचे आरोपही समोर आले आहेत. डेगू येथील मशिदी प्रकल्पातील निधीचा गैरवापर केल्याचा आरोप किमवर आहे. तसेच, २०२०मध्ये वैयक्तिक फायद्यासाठी आणि अनधिकृत मार्गाने देणग्या गोळा करून इस्लाममधील धर्मांतराचा गैरफायदा घेतल्याबद्दल तो चर्चेत आला होता. त्याने मशीद बांधण्याच्या त्याच्या योजनेबद्दल सांगून देणग्यांसाठी त्याच्या खात्याचे तपशील जाहीर केले होते. मात्र खासगी खात्याद्वारे जमा केलेल्या निधीला दक्षिण कोरियामध्ये सार्वजनिक प्रार्थनास्थळाच्या बांधकामासाठी परवानगी दिली जात नाही. अनेकांनी दाऊद किमला देणगी देऊ नका, असा इशारा दिला. दाऊद किमची पत्नी मिया हिने सन २०२०मध्ये त्याच्यासोबत धर्मांतर केले.

किमचे वैयक्तिक आयुष्यही वादात

मियाने दाऊदने तिच्यावर केलेल्या मारहाणीमुळे झालेल्या जखमांची छायाचित्रे शेअर केली आहेत आणि घटस्फोटाची कारवाई टाळण्यासाठी तो पळून गेल्याचा आरोप केला आहे.

Exit mobile version