परप्रांतीय पुन्हा वळले मुंबईकडे

परप्रांतीय पुन्हा वळले मुंबईकडे

कोरोनाकाळात अनेक परप्रांतीयांनी मुंबईकडे पाठ दाखवली आणि आपल्या गावचा रस्ता धरला. कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होताक्षणी आता पुन्हा एकदा परप्रांतियांनी मुंबईची वाट धरलेली आहे. हाताला मिळेल ते काम करत अनेक परप्रांतीय मुंबईत राहतात. फेब्रुवारीमध्ये आलेली दुसरी लाट त्यामुळेच अनेक परप्रांतीय आपापल्या गावी निघून गेले.

आता मुंबईतील निर्बंध शिथिल होऊ लागताच, पुन्हा रोजगाराच्या निमित्ताने परप्रांतीय मुंबईत दाखल होऊ लागलेले आहेत. त्यामुळेच आता रेल्वेस्थानकांवरच या मजूरांना आरटीपीसीआर सारख्या चाचण्यांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे स्थानकांवर चाचणी करून घेण्याकरता परप्रांतीयांची एकच झुंबड उडालेली आता दिसून येत आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारची आता राष्ट्रवादीच्या निर्णयालाही स्थगिती

आता आशांना बेमुदत संपाशिवाय पर्याय नाही

ठाकरे सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु

बँकांच्या खासगीकरणाबाबत मोदी सरकारचे महत्वाचे पाऊल

फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट महाराष्ट्रात आली. याच दरम्यान परप्रांतीयांनी परतीचा रस्ता धरला. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मिळेल त्या कामासाठी महाराष्ट्राकडे परप्रांतीय वळताना दिसत आहेत.

कोरोना रुग्णसंख्या कमी होताक्षणी मुंबईकडे मेल्स भरभरून येऊ लागल्या आहेत. कोरोनारुग्ण वाढीचा वेग सध्या तरी कमी आहे, त्यामुळेच आता येणारे सर्व परप्रांतीय रेल्वे स्टेशनला चाचण्यांसाठी गर्दी करून मुंबईत दाखल होताना दिसत आहेत. परराज्यातून मुंबईत येणारे अनेक प्रवासी यांची कोरोना चाचणी रेल्वे स्थानकातच करण्यात येत आहे. अनेक संवेदनशील भागांमधून मजूर येत असल्याने चाचणी आता बंधनकारक करण्यात आलेली आहे.

संशियत प्रवाशांना आरटीपीसीआर करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये मुंबईमध्ये परप्रांतीय दाखल होण्याचे प्रमाण आता वाढल्याचे दिसत आहे. गेल्या दोन महिन्यातील आकडा पाहता जवळपास २८ लाख परप्रांतीय मुंबईत परत आल्याची माहिती आता समोर आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये दाखल झालेल्या २८ लाखांपैकी एकट्या मुंबईमध्ये २१ लाख परप्रांतीय पुन्हा एकदा रोजीरोटीसाठी दाखल झाले आहेत.

Exit mobile version