लिव्हरपूलचा पंचतारांकित विजय

लिव्हरपूलचा पंचतारांकित विजय

रविवार, २४ ऑक्टोबरची संध्याकाळ एकूणच जगभरातील क्रीडारसिकांसाठी खास होती. तिकडे क्रिकेट चाहत्यांसाठी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची पर्वणी होती तर फुटबॉल चाहत्यांना मॅन्चेस्टर युनायटेड विरुद्ध लिव्हरपूल सामन्याचा थरार अनुभवता आला. मँचेस्टर युनायटेडच्या घरच्या मैदानात म्हणजेच ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात हा सामना पार पडला. दोन्ही संघ हे इंग्लिश फुटबॉल मधले अतिशय तगडे संघ मानले जात असल्यामुळे ही मॅच अतिशय अटीतटीची होणे अपेक्षित होते. पण तसे घडले नाही. लिव्हरपूलने मँचेस्टर युनायटेड संघाला ५-० अशी धूळ चारली.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच लिव्हरपूल संघाने सामन्यावरची आपली पकड मजबूत केली होते आणि ती अखेरपर्यंत तशीच राहिली सामन्याच्या पाचव्या मिनिटाला केईटा या खेळाडूने गोल नोंदवत लिव्हरपूलला आघाडी मिळवून दिली. तर ३० व्या मिनिटाला जोटोने गोल करून ती वाढवली.

हे ही वाचा:

प्रभाकर साईलने त्याचे म्हणणे कोर्टात मांडावे

कुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा

आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट…कोण आहे कुणाल जानी?

विद्यार्थी पोहोचले पण परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, प्रश्नपत्रिकाच नाहीत!

पण या सामन्याचा खरा स्टार ठरला तो लिव्हरपूलचा आक्रमण फळीतील खेळडू मोहम्मद सल्लाहने या सामन्यात ३ गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली. सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला त्यांने संघासाठी तिसरा गोल नोंदवून तर पहिल्या हाल्फच्या अतिरिक्त वेळेत दुसरा गोल नोंदवत संघाची आघाडी ४-० ने वाढवली. तर सामन्याचा उत्तरार्ध सुरू झाल्यावर ५० व्या मिनिटात तिसरा गोल करत त्याने आपली हॅट्ट्रिक साजरी केली.

या हॅट्ट्रिक सह त्याने एक नवा विक्रम रचला आहे. मँचेस्टर युनायटेड संघाच्या होम ग्राऊंड असणाऱ्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हॅट्ट्रिक करणारा सल्लाह हा प्रतिस्पर्धी संघाचा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी मँचेस्टर युनायटेडच्या कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूकडून हॅट्ट्रिक करण्यात आली नव्हती. ती कमाल मोहम्मद सल्लाहने करून दाखवले.

Exit mobile version