फुटबॉलपटू मेस्सीला कोरोनाने गाठले

फुटबॉलपटू मेस्सीला कोरोनाने गाठले

फुटबॉलचा अव्वल खेळाडू लिओनल मेस्सी याला कोरोनाची लागण झाली आहे. मेस्सी हा अर्जेंटिना संघाच्या फुटबॉल संघाचा कर्णधार असून सध्या पॅरिस सेंट जर्मन क्लबमधूनही (PSG) तो खेळत आहे. मेस्सीसह पॅरिस सेंट जर्मन क्लबमधील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. क्लबकडून याबद्दल अधिकृत माहिती ट्विट करून देण्यात आली आहे.

रविवार २ जानेवारी रोजी मेस्सीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले. क्लबच्या संघातील जुआन बर्नाच, सर्जिओ रिको आणि नथान बीटमाजाला यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या संबंधीचे ट्विट क्लबकडून करण्यात आले आहे.

नुकताच बार्सिलोना संघातून पीएसजी संघात आलेल्या मेस्सीने मानाचा ‘बॅलन डी’ओर या पुरस्कारावर सातव्यांदा आपले नाव कोरले होते. सध्या मेस्सी संघासोबत फ्रेंच कप खेळत असून नुकत्याच झालेल्या सामन्यांतर चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मेस्सीसह संघातील इतर कोरोनाबाधित सध्या विलगीकरणात असून त्यांची योग्य ती काळजी मेडीकल टीम घेत असल्याचे पीसएजी संघाने सांगितले आहे.

हे ही वाचा:

देशभरातील मुलांच्या ‘दंड’बैठका आजपासून सुरू

अंतिम दिवशी ई-फायलिंग पोर्टलवर करोडो रुपयांचा परतावा

१२ कोटींच्या बुलेटप्रूफ गाडीत बसायला जनतेचे आशीर्वाद लागतात…

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात वाढविले कृषी कर्जाचे लक्ष्य…वाचा सविस्तर

जगभरात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनासोबतच आता दक्षिण आफ्रिकेतून आलेला ओमायक्रॉनने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. या व्हेरियंटचा प्रभाव कमी असला तरी त्याचा प्रसार अधिक वेगाने होत आहे.

Exit mobile version