शिवाजी पार्कवर हिंदू .. आझाद मैदानात लिंगायत समाज आक्रमक

काय आहेत मागण्या?

शिवाजी पार्कवर हिंदू .. आझाद मैदानात लिंगायत समाज आक्रमक

विशाल हिंदू जन आक्रोश मोर्चाने एकीकडे अखंड शिवाजी पार्क भगवामय झाला आहे. दुसऱ्या बाजूला आझाद मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजही एकवटला असल्याचे बघायला मिळत आहे. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी या मागणीसाठी समस्त लिंगायत समाज आक्रमक झाला असल्याचे बघायला मिळत आहे. या दोन्ही मोर्चानी दादर आणि आजाद मैदान दुमदुमून गेलायचे बघायला मिळत आहे.

लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी आज आझाद मैदान येथे राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये धर्मगुरूंसह लिंगायत समाजातील अनेक नेते मंडळी उपस्थित आहेत. लिंगायत समाजाकडून विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता तसेच बसवेश्वर स्मारकाच्या मागणीसाठी देखील मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आज मुंबई त विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दहा हजार लिंगायत समाजबांधव या मोर्चात सहभागी झालेले असल्याची माहिती लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव यांनी दिली. या राज्यव्यापी मोर्चामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व तेलंगणा राज्यातील समाजबांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहिलेले आहे.  आझाद मैदानावर सकाळपासूनच लिंगायत समाजाचे बांधव जमा होताना दिसत आहेत. गेल्या आठवडयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत या संदर्भात चर्चा केली होती. सर्व मागण्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, लेखी उत्तराच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार

काय आहेत मागण्या?
विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा
लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा जाहिर करावा
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी
मंगळवेढा तालुक्यातील मंजूर केलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरू करावे
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे
गाव तेथे स्मशानभुमी आणि गाव तेथे सभामंडप करण्यात यावे

Exit mobile version