लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं; पेजर्सनंतर आता रेडिओ, वॉकीटॉकीमध्ये स्फोट

२० लोक ठार झाले असून ४५० हून अधिक जण जखमी

लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं; पेजर्सनंतर आता रेडिओ, वॉकीटॉकीमध्ये स्फोट

इराण समर्थित हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे सदस्य वापरत असलेले वॉकी-टॉकी, सौर उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा बुधवारी स्फोट झाला. यात २० लोक ठार झाले असून ४५० हून अधिक जण जखमी झाले. याआधी मंगळवारी लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागांमध्ये दहशतवाद्यांनी वापरलेल्या हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट होऊन १२ लोक ठार झाले होते तर, तब्बल ३ हजार लोक जखमी झाले होते. पुन्हा झालेल्या या स्फोटामुळे लेबनॉन पुन्हा एकदा हादरले आहे.

लेबनॉनमध्ये मंगळवारी हिजबुल्लाहच्या काही अधिकाऱ्यांकडील हजारो पेजर्सचे एकाचवेळी स्फोट झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या सदस्यांनी वापरलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाला आहे. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला असून ४५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पेजर बॉम्बस्फोटात १२ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच तब्बल ३ हजार लोक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा स्फोटाची घटना घडल्यामुळे लेबनॉन हादरलं आहे.

हे ही वाचा:

‘या’ देशांमध्ये पेजर्सचा अजूनही होतोय वापर, वापरण्याची कारणेही आलीत समोर!

मागाठाणेतून अमित ठाकरेंना मैदनात उतरवण्यासाठी मनविसेने कंबर कसली

गणेश उत्सवात जिहाद्यांकडून ११ ठिकाणी हल्ले

‘एक देश, एक निवडणूक’ला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ग्रीन सिग्नल!

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडिओ, वॉकी-टॉकी हे हिजबुल्लाहच्या सदस्यांनी सुमारे पाच महिन्यांपूर्वी खरेदी केले होते. पेजर्सही त्याच वेळी खरेदी केले होते. त्यामुळे हा सुनियोजित कट असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हिजबुल्लाहने हा इस्रायलच्या मोसादचा कट असल्याचा दावा केला आहे. लेबनॉन आणि इस्रायलमध्ये तणाव वाढत असताना ही घटना घडली. इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ११ महिन्यांहून अधिक काळ लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. या युद्धात सीमेच्या दोन्ही बाजूंनी हजारो लोक बेघर झाले आहेत.

Exit mobile version