इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये इराणी दूतावासावर हवाई हल्ला केल्याचे समोर आले होते. अद्यापही इस्रायलने जाहीरपणे या हल्ल्याची कबुली दिलेली नाही. पण यामागे इस्रायलचं असल्याचा दावा करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर इराणनेही इस्रायलला इशारा देत याचे उत्तर देणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढत चालला आहे. इराण लवकरच इस्रायलच्या अनेक ठिकाणांवर हल्ला करु शकतो, असा अमेरिकेने दावा केला आहे. त्यामुळे आता भारतानेही या दोन्ही देशांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला भारतीयांना दिला आहे.
युद्धाची शक्यता वर्तवली जात असतानाच दरम्यान लेबनानने इस्रायलवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. लेबनानने उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सने याबाबतीतले वृत्त दिले आहे. तसेच इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच हे रॉकेट नष्ट केल्याची माहिती आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, “रॉकेट हल्ल्याच्या काहीवेळ आधी उत्तर इस्रायलयमध्ये अलर्ट सायरन वाजवण्यात आले होते. त्यानंतर हा हल्ला झाला. लेबनानच्या क्षेत्रातून येणाऱ्या ४० रॉकेट्सची ओळख पटवून काही हवेतच नष्ट करण्यात आली. काही रॉकेट्स मोकळ्या जागेत पडली. अजूनपर्यंत कोणाचाही मृत्यू किंवा जखमी झाल्याची सूचना मिळालेली नाही.”
Approx. 40 launches were identified crossing from Lebanese territory, some of which were intercepted.
The IDF Aerial Defense Array successfully intercepted 2 Hezbollah explosive UAVs that crossed from Lebanon into Israeli territory earlier this evening. pic.twitter.com/3iAVnEupcO
— Israel Defense Forces (@IDF) April 12, 2024
लेबनानच्या रॉकेट हल्ल्यानंतर अमेरिका सर्तक झाली आहे. इराणकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिका मध्य पूर्वेमध्ये अतिरिक्त सैन्य पाठवणार आहे. दरम्यान, इराणवर हल्ल्यासाठी आम्ही आमच्या सैन्य तळांचा वापर करु देणार नाही, असा कुवेत आणि कतारने अमेरिकेला इशारा दिला आहे.
हे ही वाचा:
अल्पवयीन यझिदी मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना जर्मनीत अटक
अयोध्येमध्ये राम मंदिर, जगभरात वाढता भारताचा मान!
इराणचा इस्रायलवर कधीही हल्ला होण्याची भीती
गेल्या महिन्यात दमास्कसमधील इराणच्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेला इराण पुढील ४८ तासांत इस्रायलवर युद्ध करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्स, भारत, रशिया, पोलंड आणि ब्रिटन या देशांनी आपल्या नागरिकांना इस्रायलला जाऊ नये, इशारा दिला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही शुक्रवारी अधिसूचना जाहीर करून भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्यास सांगितले आहे. सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून आपली नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आणि त्यांच्या हालचाली कमीत कमी मर्यादित ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.