लेबनॉन स्फोटातील उपकरणे जपानी कंपनीची; उत्पादने २०१४ मध्येचं बंद केल्याचा कंपनीचा दावा

दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या सदस्यांनी वापरलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट

लेबनॉन स्फोटातील उपकरणे जपानी कंपनीची; उत्पादने २०१४ मध्येचं बंद केल्याचा कंपनीचा दावा

इराण समर्थित हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे सदस्य वापरत असलेले वॉकी-टॉकी, सौर उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा बुधवारी स्फोट झाला. यात २० लोक ठार झाले असून ४५० हून अधिक जण जखमी झाले. याआधी मंगळवारी लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागांमध्ये दहशतवाद्यांनी वापरलेल्या हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट झाला होता. यात आता एका जपानी कंपनीचे नाव समोर आले आहे.

जपानी रेडिओ उपकरणे निर्माती कंपनी ICOM ने सांगितले की लेबनॉनमध्ये ज्या उपकरणांमध्ये स्फोट झाला ती उपकरणे त्यांच्या कंपनीने पाठवल्या होत्या की नाही याची पुष्टी आता करू शकत नाही. कंपनीच्यामते जवळपास दशकापूर्वी बंद केलेल्या बॅटरीची आवश्यकता असलेले हे उपकरण २०१४ पासून उत्पादनाबाहेर आहे. शिवाय, या उपकरणांसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरी देखील बंद केल्या आहेत.

जपानची ICOM ही कंपनी टोकियो स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध आहे. या स्फोटांच्या वृत्तानंतर ICOM कंपनीने म्हटले आहे की, गुरुवारी जाहीर केले की ते लेबनॉनमध्ये त्यांचा लोगो असलेल्या द्वि-मार्गी रेडिओ उपकरणांची चौकशी करत आहेत. ICOM कंपनी जपानमध्ये त्यांचे सर्व रेडिओ बनवते शिवाय लेबनॉनमध्ये स्फोट झालेली यंत्रे ही या कंपनीची अधिकृत उत्पादने होती की नाही हे तपासणे कंपनीसाठी कठीण असणार आहे कारण हे मॉडेल एका दशकाहून अधिक काळ बंद आहेत. ओसाकामधील एका कंपनीने सांगितले की परदेशातील बाजारपेठांसाठी सर्व उत्पादने अधिकृत वितरकांद्वारेच विकली जातात आणि जपानच्या सुरक्षा व्यापार नियंत्रण नियमांचे पालन करून निर्यात कठोरपणे तपासली जाते.

कंपनीने याआधी आपल्या उपकरणांच्या बनावट आवृत्त्या, विशेषतः जुने, बंद केलेले मॉडेल्स बाजारात फिरत असल्याबद्दल तक्रार दिली होती. स्फोट झालेल्या वॉकी-टॉकीजच्या आत ICOM आणि जपानमध्ये बनवलेले असं लिहिले असल्यामुळे या कंपनीचे नाव समोर आले आहे.

हे ही वाचा : 

वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात, तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर ?

लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं; पेजर्सनंतर आता रेडिओ, वॉकीटॉकीमध्ये स्फोट

सायन पुलावर दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर

धारावीत धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलीला चाकुचा धाक दाखवून बलात्कार

दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या सदस्यांनी वापरलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाला आहे. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला असून ४५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पेजर बॉम्बस्फोटात १२ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच तब्बल ३ हजार लोक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा स्फोटाची घटना घडल्यामुळे लेबनॉन हादरलं आहे.

Exit mobile version