इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्ध उग्र होत असून त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव झपाट्याने वाढत आहे. यासंदर्भात, बेरूतमधील भारतीय दूतावासाने बुधवारी (२५सप्टेंबर) लेबनॉनमधील भारतीय नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी जारी केली आणि त्यांना ताबडतोब देश सोडण्याचा सल्ला दिला आहे.
बेरूतमधील भारतीय दूतावासाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली की, ‘प्रदेशातील तणाव लक्षात घेता, भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत लेबनॉनला प्रवास करणे टाळावे. लेबनॉनमध्ये आधीपासूनच उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी ताबडतोब लेबनॉन सोडावे. तसेच जे कोणत्याही कारणास्तव थांबले आहेत, त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, त्यांनी आपल्या हालचाली थांबवाव्यात आणि बेरूतमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे सल्ला भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरिकांना देण्यात आला आहे.
हे ही वाचा :
पावसाच्या व्यत्ययामुळे नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द!
४०० कोटींच्या ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पर्दाफार्श; चीनी नागरिकांची क्रिप्टो खाती गोठवली
न्युयॉर्कमधील मंदिरानंतर समाजकंटकांकडून कॅलिफोर्नियातील श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्य
अंधेरीत महिलेचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू
दरम्यान, इस्रायल आणि लेबनॉनमध्ये अजूनही युद्ध सुरु आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी इस्रायलने हिजबुल्लाला लक्ष्य करत हवाई हल्ला केला होता. यामध्ये ५८० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्याचा बदला म्हणून हिजबुल्लाने २०० रॉकेट इस्रायलवर डागले. मात्र, त्यातील बरेच रॉकेट नष्ट केल्याचे इस्रायलच्या सैनिकांकडून सांगण्यात आले, तसेच काहीच नुकसान न झाल्याचेही सांगण्यात आले.
Advisory dated 25.09.2024 pic.twitter.com/GFUVYaqgzG
— India in Lebanon (@IndiaInLebanon) September 25, 2024