बब्बर खालसा इंटरनॅशनलचा नेता भारताकडून दहशतवादी घोषित

बब्बर खालसा इंटरनॅशनलचा नेता भारताकडून दहशतवादी घोषित

बब्बर खालसा इंटरनॅशनलचा (बीकेआय) नेता आणि गँगस्टर लखबीरसिंग लांडा याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. भारत सरकारने बेकायदा कारवाया प्रतिबंधक नियमावलीनुसार हा निर्णय घेतला आहे. लांडा हा पंजाबच्या तरनतारन जिल्ह्याचा रहिवासी आहे. सद्यस्थितीत तो कॅनडातील एडमोंटन, अल्बर्टामध्ये राहतो.

गृह मंत्रालयाने शुक्रवारी एका अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला. लांडा हा पाकिस्तानमधून भारतात तस्करी केली जाणारी शस्त्रे आणि आयईडी हत्यारांची देखरेख करत होता. लांडा हा मे २०२२मध्ये पंजाब पोलिसांच्या मुख्यालयावर झालेल्या रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (आरपीजी) हल्ल्याचा मास्टरमाइंडही होता. या प्रकरणी त्याच्याविरोधात पंजाब पोलिस आणि एनआयएमध्ये गुन्हा दाखल आहे.

हे ही वाचा:

रशियाने युक्रेनवर १२२ क्षेपणास्रं डागली; ३१ नागरिक ठार

अभिषेक सोहळ्यापूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रचंड विक्री!

अयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!

कर्नाटक: एकाच कुटुंबातील पाच जणांचे घरात सापडले सांगाडे!

सद्यस्थितीत तो फरार असून कॅनडामध्ये लपून बसला आहे. लांडा हा कॅनडातील खलिस्तान समर्थक संघटनांशीही जोडलेला आहे. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडा पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून आईडी, शस्त्रे, स्फोटकांचा पुरवठा करतो. पंजाबसह अन्य राज्यांतही दहशतवादी हल्ल्यांना तो शस्त्रसाठ्याचा पुरवठा करतो. तो खंडणी, हत्या, स्फोट, अमली पदार्थ आणि शस्त्रांच्या तस्करीमध्येही सहभागी आहे. लांडा याच्या विरोधात सन २०२१मध्ये लुट आऊट नोटीस जाहीर करण्यात आली होती. एनआयएने त्याच्यावर बक्षीसही जाहीर केले आहे.

Exit mobile version