उत्तर कोरियाच्या किम जोंगचा रडका निर्णय; कुणीही हसायचे नाही

उत्तर कोरियाच्या किम जोंगचा रडका निर्णय; कुणीही हसायचे नाही

उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन हा त्याच्या विक्षिप्त निर्णयांमुळे नेहमी चर्चेत असतो. आता त्याच्या अशाच आणखी एका विक्षिप्त निर्णयामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उत्तर कोरियात आता ११ दिवस हसण्यावर बंदी असणार आहे. देशाचे माजी नेते आणि सध्याचा हुकुमशाह किम जोंग उनचे वडील किम जोंग- इल यांच्या १०व्या पुण्यतिथिच्या निमित्ताने सरकारने लोकांच्या हसण्यावर बंदी घातली आहे.

किम जोंग- इल याच्या पुण्यतिथी निमित्त ११ दिवसांपर्यंत देशात कुणीही आनंद साजरा करु शकणार नाही. तसेच राष्ट्रीय शोक असल्याने लोकांना हसणे आणि दारु पिण्यावर बंदी असणार आहे. जर लोकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय शोक असलेल्या काळात जर कुणी दारु प्यायलेले किंवा नशा करताना पकडले गेले तर तो व्यक्ति आजवर परत आलेला नाही. सोबतच राष्ट्रीय शोक असताना जर कुणाच्या घरी मृत्यू झाला तर त्या परिवाराला जोरात रडण्याची देखील परवानगी नाही. या काळात पोलिसांची लोकांवर करडी नजर असते.

हे ही वाचा:

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

‘या’ तारखेपासून होणार दहावी- बारावीच्या परीक्षा

शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच वेळ!

काही दिवसांपूर्वीच किम जोंग उन याने आपल्या देशातील लोकांसाठी एक नवा विचित्र नियम लागू केला आहे. हुकूमशहा किम जोंग उन याच्या लेदर कोटची कॉपी केल्याचे लक्षात येताच त्याने देशात लेदर कोटच्या विक्रीवर आणि परिधान करण्यावरच बंदी घातली आहे.

Exit mobile version