मुंबईकरांना विक्रमी हुडहुडी

मोसमातील सर्वात कमी तापमान

मुंबईकरांना विक्रमी हुडहुडी

मुंबईत हुडहुडी वाढली असून मुंबईकरांना मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्यानुसार , मुंबईत आज सकाळी पारा १३.८ अंशावर पोहोचला आहे. हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी तापमान आहे. मुंबईत १५ ते १७ जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने गेल्या आठवड्यामध्ये वर्तवला होता. त्यानुसार, मुंबईतील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे.

मुंबईत रविवारी दिवसाच्या कमाल तापमानामध्येही घट झालीहोती आणि रविवारी कमाल तापमान २६.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा पण पाच अंश कमी होते. यंदाच्या हिवाळ्यात आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान गेल्या महिन्याच्या २५ डिसेंबर ला १५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर आज १३ पूर्णांक ८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईची हवा बिघडतेय, प्रदूषणात मोठी वाढ
मुंबईतील तापमानात घट झाल्यानंतर शहरातील हवेची गुणवत्ता पातळी कमालीची खालवली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यापुन्हा एकदा डोकं वर काढू शकतात. मुंबईतील किमान तापमानात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी अशी नोंदआ ज बघायला मिळाली आहे. मुंबईतील किमान तापमान १३.८ अंशांवर गेल्याचं बघायला मिळालं आहे.दिल्लीपेक्षाही जास्त मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावल्याचं हवामान खात्याच्या नोंदीनुसार पाहायला मिळालं.
हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही ढासळली.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक मोदींच्या प्रेमात; भारताच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक

काँग्रेसच्या सुधीर तांबे यांचे पक्षातून निलंबन, उमेदवारी अर्ज न भरल्याची शिक्षा

प्रत्येक भारतीयाला आपल्या लष्कराचा अभिमान

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, कोणतीही इजा नाही

मुंबईची सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ३२२ वर होता. तर दिल्लीतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक २२१ वर बघायला मिळाला. राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा खराब झाल्याचं या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.  पुढील काही दिवसात मुंबईच्या हवेची पातळी सुधारली नाही, तर आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढू शकते असं अनुमान काढले जात आहे.

निफाड येथे सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद
राज्याच्या किमान तापमानात घट दिसून येत आहे. किमान तापमानात पुन्हा घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात थंडी टिकून आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम राहणार आहे. निफाड येथे नीचांकी ५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथेही तापमानाचा पारा दहा अंशांपेक्षा खाली होता.

Exit mobile version