‘यॉर्कर किंग’ मलिंगा अब नही खेलेंगा!

‘यॉर्कर किंग’ मलिंगा अब नही खेलेंगा!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

श्रीलंकेचा महान अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने मंगळवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली. यापूर्वी ३८ वर्षीय मलिंगाने कसोटी आणि वन- डेतून निवृत्ती जाहीर केली होती. मलिंगाने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटद्वारे निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. ‘मी आता टी- २० मधून निवृत्त होतो आहे. आता एकूणच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होतो आहे. या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे. माझा अनुभव भविष्यात युवा खेळाडूंसोबत शेअर करण्यास उत्सुक आहे.’ असे मलिंगाने म्हटले आहे.

मलिंगाने श्रीलंकेकडून सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५४६ विकेट घेतल्या आहेत. मलिंगाने १२२ आयपीएल सामन्यात १७० विकेट घेतल्या आहेत. लीगमध्ये खेळणे त्याने जानेवारीमध्येच बंद केले होते. गेल्यावर्षी होणाऱ्या टी- २० वर्ल्ड कपमध्ये त्याने खेळण्याची इच्छा दर्शवली होती. यानंतर या वर्षी होणाऱ्या टी- २० वर्ल्ड कपसाठी त्याचा श्रीलंका संघात विचार करण्यात आला नव्हता. टी- २० मध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली होती.

हे ही वाचा:

कोकणातून परतण्यासाठी फक्त पाच गाड्या?

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांत मुंबईतला जान मोहम्मद

प्रसिद्ध चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन

सिंह आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे ‘झेब्रा क्रॉसिंग’

आंतरराष्ट्रीय टी- २० मध्ये पहिल्यांदा १०० विकेट्स मिळवण्याचा मान लसिथ मलिंगाने मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मलिंगा अव्वल स्थानी आहे. डावात पाच विकेट घेण्याची कामगिरी त्याने दोन वेला केली आहे, तर सहा धावांत पाच विकेट ही त्याची टी- २० मधली सर्वोत्तम कामगिरी आहे. आंतरराष्ट्रीय टी- २० मध्ये दोन हॅट्रिक त्याच्या नावावर आहेत.  त्याने २९५ टी- २० सामन्यांत ३९० विकेट घेतल्या आहेत.

Exit mobile version