पहिल्या महिला तिकीट तपासनीसचे कौतुक

तब्बल वसूल केला प्रवाशांकडून एक करोड रुपयांचा दंड

पहिल्या  महिला तिकीट तपासनीसचे  कौतुक

दक्षिण रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षक रोजलीन अरोकीय मेरी यांनी विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल एक पूर्णांक तीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे रेल्वे मंत्रालयाचे कौतुक होत असून रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून रोजलीन मेरी यांच्या या कामाचे कौतुक केले आहे. रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या कामाच्या वेळची छायचित्रे आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली आहेत.

छायाचित्रांमध्ये त्या अनियमित आणि विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल करणाऱ्या पहिल्या महिला निरीक्षक असून त्या दंड वसूल करत असतानाची प्रवाशांबरोबरची त्यांची हि छायचित्रे आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे रेल्वे मंत्रालयाचे पण कौतुक होत आहे. त्यांनी एवढी मोठी रक्कम वसूल केल्यामुळे कौतुक झाले आहे.

हे ही वाचा:

कर्माची फळे!! राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडण्यास सांगितले नसते तर आज ते खासदार असते!

जागतिक उद्दिष्ट २०३० पण भारत २०२५ पर्यंत क्षयरोग मूक्त होणार

भारत दौऱ्यावर आलेले अजय बंगा कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईकरांसाठी गुड न्यूज..बालहट्टापायी मोडीत काढलेला गारगाई-पिंजाळ पाणी पुरवठा प्रकल्प पुन्हा सुरू होणार

या बाबत ट्विटर वर फोटो बघून रोसलीन च्या एका मित्राने मी तुझा मित्र असल्याचा अभिमान असल्याचे म्हंटले आहे. तुला ओळखून मला तुझ्या कर्तृत्वाचे आश्चर्य वाटत नाही. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि, आपल्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी अशाच चॅलेंजिंग आणि समर्पित अशाच महिलांची गरज आहे.तुम्ही खूप चॅन काम केले आहे तुम्हाला आमचा सलाम असे अनेक चांगले अभिप्राय त्यांना मिळत आहेत. दरम्यान , रोसलीन यांनी एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या वर्षात हा दंड प्रवाशांकडून वसूल केलेला आहे.

Exit mobile version