२४ वर्षांची महिला बनली २१ मुलांची आई!

२४ वर्षांची महिला बनली २१ मुलांची आई!

जॉर्जियामधील क्रिस्टीना आणि गलीप ओझटर्क या जोडप्याला २२ बाळं असून तिने वयाच्या १७ व्या वर्षी आपल्या पहिल्या बाळाला नैसर्गिकरित्या जन्म दिला होता. त्यानंतर अवघ्या १० महिन्यांमध्ये १० सरोगेट बाळांना जन्म दिला. दहाव्या सरोगेटनंतर ती आणि तिच्या पतीने आणखी २१ बाळांना जन्म दिला. रशियात राहणारी ही क्रिस्टीना २१ मुलांची आई आहे. तिने तिच्या २१ मुलांचा सांभाळ करण्यासाठी १६ आया ठेवल्या आहेत.

क्रिस्टीना ओझटर्क ही गलीप ओझटर्क या एका करोडपतीची पत्नी आहे. तिने गेल्या वर्षी मार्च ते या वर्षी जुलै दरम्यान सरोगेट्सद्वारे पालक होण्यासाठी १ कोटी ४६ लाख ७८ हजार १५६ रुपये खर्च केले आहेत. क्रिस्टीना घरात राहणाऱ्या १६ आयांवर दरवर्षी ९६ हजार डॉलर म्हणजेच ७२ लाख ८ हजार २६५ रुपये खर्च करते. या आया २४ तास मुलांची काळजी घेण्यासाठी काम करतात.

या कुटुंबात क्रिस्टीना तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलांसह एकूण २३ मुलांसोबत एकाच छताखाली राहतात. क्रिस्टीना आग्रहाने हे सांगते की, ती एक व्यावहारिक आई आहे. ती म्हणाली की, ‘मी प्रत्येक वेळी मुलांसोबत असते, प्रत्येक आई जे काही करते ते सर्व मी करते.’

हे ही वाचा:

वानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…

समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?

‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे

मुंबईतून २४ किलो चरस जप्त; चार आरोपींना अटक

‘मी लहानपणापासून हे स्वप्न पाहत आहे. माझ्या पतीनेही असेच स्वप्न पाहिले होते की, एक मोठे आणि आनंदी कुटुंब असावे, म्हणून आम्ही भेटल्यानंतर आम्ही आमचे स्वप्न प्रत्यक्षात आणू लागलो’, असे क्रिस्टीनाने ‘फॅब्युलस’ला सांगितले.

क्रिस्टीनाने सोशल मिडीयावरून एका पोस्टमध्ये दरमहा किती खर्च करतात या बद्द्ल माहीती दिली. तिच्या मोठ्या कुटुंबासाठी सरोगेट्सना सुमारे £१ लाख ३८ हजार दिले आहेत. यापूर्वी, तिने ‘द सन’ला सांगितले होते की, ती मुलांवर दर आठवड्याला सुमारे £३ हजार ५०० ते £४ हजार २०० इतके खर्च करते. मुलांना सांभाळणाऱ्या आयांसाठी, त्यांना आठवड्याला £३५० दिले जातात. १६ आयांवर दरवर्षी ९६ हजार डॉलर म्हणजेच ७२ लाख ८ हजार २६५ रुपये खर्च करते.

Exit mobile version