24 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरदेश दुनियागावकऱ्यांचे भाग्यच उजळले; मिळाले प्रत्येकाला तब्बल ५८ लाख

गावकऱ्यांचे भाग्यच उजळले; मिळाले प्रत्येकाला तब्बल ५८ लाख

त्यांनी गावांमधील विद्यार्थ्यांना इतिहासाची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचेही वाटप केले.

Google News Follow

Related

एका अब्जावधी उद्योगपतीने त्याच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला लाखो रुपये दान केले. हा उद्योगपती पूर्वी हालाखीच्या परिस्थितीत असताना त्याला गावातील काही कुटुंबांनी मदत केली होती. त्याची परतफेड करण्यासाठी या उद्योगपतीने गावकऱ्यांना रोख रक्कम वाटली आहे. त्यामुळे संपूर्ण गावच मालामाल झाले आहे.

हा अब्जावधी उद्योगपती आहे, बांधकाम व्यवसायातील बूयूंग ग्रुपचे संस्थापक ली जोंग क्यून की. ८२ वर्षीय जोंग दक्षिण कोरियाचे आहेत. नुकतेच त्यांनी सनचिओन शहरातील अनपयोंग-री या छोट्या गावातील लोकांना सुमारे ५८-५८ लाख रुपये दिले. त्यांनी गावांमधील विद्यार्थ्यांना इतिहासाची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचेही वाटप केले.

 

हे ही वाचा:

बांग्लादेशी मुलीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्याची ‘घरवापसी’

प्रदीप कुरुलकर त्या पाक एजंटकडे आकर्षित झाले आणि खूप काही सांगून बसले!

कर्नाटक विधानसभेत बजेट सत्र सुरू असतानाच एक माणूस घुसला

‘आदिपुरुष’ प्रकरणी मनोज मुंतशीरकडून जाहीर माफी!

‘द कोरियन हेराल्ड’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या गावात एकूण २८० कुटुंब राहतात. अब्जाधीश जोंग यांनी सर्व कुटुंबांना प्रत्येकी ५८ लाख रुपये दिले. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या शालेय मित्रांनाही लाखो रुपयांच्या भेटी दिल्या. सगळे मिळून जोंग यांनी तब्बल १५०० कोटी रुपयांचे दान केले. दानाची रक्कम जोंग यांच्या वैयक्तिक निधीतून देण्यात आली. एकेकाळी जोंग यांना परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. तेव्हा गावातील काही लोकांनी त्यांना आधार दिला होता. त्यामुळे आता सक्षम झाल्यानंतर त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी या रोख रकमेचे वाटप केले आहे.

 

सन १९४१मध्ये जन्मलेल्या जोंग यांनी १९७०मध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून काम सुरू केले होते. आता त्यांची संपत्ती सुमारे दीड लाख कोटी इतकी आहे. दक्षिण कोरियातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये त्यांची गणना होते. ते दानधर्म करण्यासाठी प्रसिद्ध असले तरी करचोरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात त्यांना यापूर्वी अटकही झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा