जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा भारत आणि जपान या दोन्ही देशांसाठी महत्वाचे मानले जात आहे. कारण जी २० चे अध्यक्षपद भारताकडे आहे तर जी ७ चे अध्यक्षपद जपानकडे आहे. या सगळ्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किशिदा बरोबर दिल्लीच्या बुद्ध जयंती पार्कमध्ये एकत्र फेरफटका मारताना दिसले आहेत. यानंतर दोघांनीही भारतीय खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला.
Prime Minister Narendra Modi and Japanese PM Fumio Kishida visit Buddha Jayanti Park in Delhi; also visit the Bal Bodhi Tree at the park. pic.twitter.com/xRz8V0PDQX
— ANI (@ANI) March 20, 2023
या दोन्ही नेत्यांनी नंतर उद्यानातील बालबोधी वृक्षाला भेटसुद्धा दिली. जपानचे पंतप्रधान किशिदा आणि पंतप्रधान मोदी यांनी एकत्र गोलगप्पे , कैरीचे पन्हे आणि लस्सीचा स्वाद सुद्धा घेतला. दोन्ही पंतप्रधानांनी रवीने ती लस्सी घुसळली. नंतर तिथल्या माणसाने त्यांना मातीच्या भांड्यात ती लस्सी दिल्यावर दोघांनीही तिचा आस्वाद घेतला. मग वेळ होती गोलगप्प्यांची. अर्थात पाणीपुरीची. खास बनविलेलील ती पाणीपुरी पांढऱ्या शुभ्र बशीत देण्यात आली. मग ती आंबटगोड पाण्याने भरलेली पाणीपुरी किशिदा यांनी तोंडात टाकली आणि त्यांना ती आवडली. नरेंद्र मोदींनाही अशीच पाणीपुरी देण्यात आली. त्यांनीही त्याचा स्वाद चाखला. मग दोघेही राष्ट्रप्रमुख उद्यानातील एका आसनावर बसून कुल्हडच्या चहाचा आस्वाद घेताना दिसले. मोदींनी कदंब लाकडापासून बनविण्यात आलेल्या एका नक्षीदार छान खोक्यामधून चंदनाची बुद्धांची मूर्ती सप्रेम भेट दिली. जी कर्नाटकीय परंपरेशी निगडित आहे. कोरीव काम केलेल्या चंदनाच्या मूर्ती ही जुनी परंपरा आहे.
हे ही वाचा:
बागेश्वर बाबांच्या दरबारात मारला होता ४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ल्ला , ६ जण ताब्यात
ठाकरे गटातील कोणत्या नेत्यांचे श्रीलंका, सिंगापूर आणि लंडनमध्ये हॉटेल्स
पन्हाळगडावर चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात
‘त्या’ विधानाची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक पोहचले राहुल गांधी यांच्या निवासस्थानी
जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी दिल्लीतील हैदराबाद हाऊस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान किशिदा हे द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दरम्यान किशिदा यांनी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी सकाळी ते दिल्लीत दाखल झाले असून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी विमानतळावर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांचे स्वागत केले आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेण्यासाठी नेत्यांची राष्ट्रीय राजधानीतील हे भेट म्हणजे उत्तम संधी असल्याचे बोलले जात आहे.