25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरदेश दुनियाखलिस्तानींसाठी आता डरना जरूरी है...

खलिस्तानींसाठी आता डरना जरूरी है…

हरदीप सिंग निज्जरची हत्या झाल्यानंतर खलिस्तानी धास्तावले

Google News Follow

Related

खलिस्तानी दहशतवाद्यांच्या झालेल्या हत्या आणि गूढ मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये लपलेल्या अनेक खलिस्तांनीमध्ये भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे. सहा महिन्यांत चार मुख्य खलिस्तानी मारले गेले आहेत. एकीकडे भारताकडून फुटीरतावादी संघटनांना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न सुरू असताना या घटना घडत आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, अमेरिकेत राहणारा गुरपतवंत सिंह पन्नू हा खलिस्तानसाठी जनमत घेण्याची मोहीम चालवतो. तो स्वत: गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. केवळ पन्नूच नव्हे तर अन्य खलिस्तानीही लपून बसले आहेत. कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि ग्रीससारख्या देशांतील खलिस्तानी संघटनेशी संबंधित अनेक दहशतवादी लपून बसले आहेत.

हरदीपसिंग निज्जरच्या हत्येने धास्ती

१८ जून रोजी कॅनडातील सरे येथे खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची गोळी मारून हत्या करण्यात आल्यानंतर खलिस्तानींमधील दहशतवाद वाढला आहे. खलिस्तानी टायगर फोर्सच्या हरदीपसिंग निज्जर याची कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर गोळी मारून हत्या करण्यात आली होती. निज्जर (४५) याचे नाव भारतातील दहशतवाद्यांमध्ये होते. तसेच, त्याच्यावर १० लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. या हत्येनंतर सर्व दहशतवादी धास्तावले आहेत. कोण होता खांडा?

आणखी एक प्रमुख दहशतवादी अमृतपाल सिंग याचा म्होरक्या अवतारसिंग खांडा याचा गूढ मृत्यू झाल्याने त्यांची भीती आणखी वाढली आहे. खांडाला कर्करोगाचे निदान झाले होते. त्याचा ब्रिटनमधील रुग्णालयात मृत्यू झाला. त्याने विष प्राशन केल्याचे सांगितले गेले होते. अवतारसिंग सुरुवातीला सन २००७मध्ये शिक्षण व्हिसावर ब्रिटनमध्ये गेला होता. त्यानंतर सन २०१२मध्ये तिथे शरणार्थी झाल्यानंतर तो पुन्हा भारतात परतला नाही. काही महिन्यांपूर्वी लंडनस्थित भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर फडकणाऱ्या भारताच्या राष्ट्रध्वजावर हल्ला झाला होता.

या प्रकरणी आणि अन्य भारतविरोधी कारवायासंदर्भात त्याच्याकडे संशयाची सुई वळली होती. मात्र त्याने हे आरोप फेटाळले होते. त्याचे कुटुंबीय आताही मोगा जिल्ह्यातील पुराना येथे राहते. तो भारतीय तुरंगात असलेल्या अमृतपाल सिंग याच्या म्होरक्यांपेकी एक होता. त्याने अमृतपालचा पोलिसांपासून बचाव करण्यासाठी सुमारे एक महिना मदत केली. अमृतपालला अटक झाल्यानंतर अवतारने ‘वारिस पंजाब दे’ ही संघटना चालवण्यासाठी विदेशात राहणाऱ्या खलिस्तानी समविचारींची समिती बनवली होती.

पाकिस्तानमध्येही खलिस्तानीची हत्या

मे महिन्यात खलिस्तानी कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीतसिंग पंजवार याची पाकिस्तानमधील लाहोर येथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळी मारून हत्या केली होती. जानेवारीत लाहोरजवळ एका गुरुद्वाराच्या परिसरात हरमितसिंग उर्फ हॅप्पी पीएचडीची हत्या करण्यात आली होती. हरमितसिंग हा अमली पदार्थांची तस्करी आणि खलिस्तानी दहशतवाद्यांना प्रशिक्षणात सामील होता.

आता पन्नून भीतीच्या छायेत

अमेरिकेमध्ये राहणारा आणि खलिस्तानी मोहीम चालविणारा गुरपतवंत पन्नून गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. १८ जून रोजी त्याच सहकारी हरदीपसिंग निज्जर याची गोळी झाडून हत्या झाली होती. पन्नून आणि निज्जर एकत्र काम करत होते. त्यांनी खलिस्तानी जनमत घेण्यासाठी ऑस्ट्रेलियासहित अन्य देशांचा दौरा केला होता. खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख निज्जर याने सन २०१९मध्ये पन्नूनशी हातमिळवणी केली होती. त्यांच्यावर कॅनडामध्ये सन २०२०मध्ये खलिस्तानी संदर्भातील जनमत घेण्याची मोहीम सोपवण्यात आली होती. त्याने या संदर्भात कॅनडातील सरे आणि व्हँकूवरमध्ये अनेक रॅलीही काढल्या होत्या. निज्जरची हत्या झाल्यानंतर पन्नून यानेही प्रचार बंद केला असून तिथपासून कोणताही ऑडिओ, व्हिडीओ जाहीर केलेला नाही.

हे ही वाचा:

दर्शना पवारची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरेला अटक, हत्येचे कारण स्पष्ट

कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दोन पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी

अजित पवार बाटली का फिरवत होते कळलं का?

पाटण्यातील बैठकीपूर्वी विरोधकांना दणका, एचएएमचे जीतन राम मांझींचा भाजपाला पाठींबा

‘खलिस्तानींच्या हत्येमागे भारत’

खलिस्तानी दहशतवाद्यांच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थक संघटनांनी केला आहे. भारताच्या तपास यंत्रणांमुळे दहशतवाद्यांवर लपण्याची वेळ आल्याचे म्हटले जात आहे. कॅनडातील विश्व शीख संघटनेने मंगळवारी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा आरोप केला. त्यांनी कॅनडातील गुप्तचर यंत्रणेला निज्जर याच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, या हत्येमध्ये परदेशी विशेषत: भारताचा हात आहे का, हे तपासण्याची मागणी केली.

तपासाची जबाबदारी एनआयएकडे

राष्ट्रीय तपास यंत्रणेने सध्या अमेरिका आणि कॅनडामध्ये मार्चमध्ये खलिस्तानी समर्थकांनी भारतीय कार्यालयांवर केलेल्या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी घेतली आहे. या वर्षी मार्चमध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्ताच्या बाहेर झालेल्या हिंसक घटनेचा तपासही एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा