खलिस्तानी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दहशतवादी हत्या प्रकरणात कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, कॅनडामध्ये आणखी एका खलिस्तानी समर्थकाची हत्या करण्यात आली आहे. कॅनडामध्ये राहणारा दहशतवादी सुखदूल सिंग याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली. दहशतवादी सुखदूल हा राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या म्हणजेच एनआयएच्या वाँटेड लिस्टमध्ये होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, दविंदर बंबीहा गँगमधील सुखदूल सिंग उर्फ सुक्खा याची हत्या करण्यात आली आहे. हरदीप सिंग निज्जर याच्या प्रणाणेच अज्ञातांनी गोळी मारून त्याची हत्या केली. गँग वॉरमधून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांना मदत करण्याचा आरोप त्याच्यावर होता.
२०१७ साली पंजाबमधून खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या मदतीने पळून तो कॅनडाला गेला होता. खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग विश्वासू अशी सुखदूलची ओळख होती. त्यानंतर त्याच्याविरोधात भारतात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतात कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अनेक गँगस्टर कॅनडाला पळून गेले आहेत. कॅनडामध्ये खलिस्तान समर्थकांकडून अशा गँगस्टर्सना मिळत असून ते भारतविरोधी अजेंडा चालवत असल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
भारत-कॅनडा वाद: पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावर शशी थरूर यांची टीका
दहशतवादी घोषित करताच निज्जरला मिळाले होते नागरिकत्व
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, ४५४ विरुद्ध २ मतांनी झाले संमत
शर्टाचे बटण उघडे ठेवल्यामुळे गुन्हा !
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुक्खा दुनेके याला तब्बल १५ गोळ्या मारण्यात आल्या. बुधवार आणि गुरुवार यादरम्यान रात्री विनीपग येथे त्याला गोळ्या घालण्यात आल्या. यादरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे आरोप केल्याने दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव आहे.