32 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरक्राईमनामा१३ डिसेंबरपर्यंत संसदेवर हल्ला करण्याची खलिस्तानी दहशतवादी पन्नुची भारताला धमकी

१३ डिसेंबरपर्यंत संसदेवर हल्ला करण्याची खलिस्तानी दहशतवादी पन्नुची भारताला धमकी

धमकीमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Google News Follow

Related

खलिस्तानी दहशतवादी आणि सिख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताला धमकी देत आगपाखड केली आहे. त्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून भारताच्या संसदेवर १३ डिसेंबर किंवा त्याआधी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्याने दिलेल्या धमकीमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

१३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला होता. याच दिवशी किंवा याआधी पन्नूने संसदेवर पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये २००१ संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरु याचे पोस्टर आणि ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ असे शीर्षक वापरण्यात आले आहे.

भारतीय एजेन्सींनी मला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा प्रयत्न फसला आहे. याचा बदला म्हणून १३ डिसेंबरपर्यंत संसदेवर हल्ला केला जाईल, अशी धमकी पन्नूने दिली आहे. विशेष म्हणजे सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. १९ दिवस चालणारे अधिवेशन २२ डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

गुरपतवंत पन्नूला पाकिस्तान मदत करत असून त्यांच्याच मदतीने तो भारताला इशारा देत आहे, अशी माहिती असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी द फायनान्शियल टाईम्सने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली होती की, पन्नू याची हत्या करण्याचा भारतीय एजन्सीचा प्रयत्न अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. पन्नू हा अमेरिकी नागरिक आहे. भारताने सिख फॉर जस्टिस या संघटनेवर बंदी आणलेली आहे.

हे ही वाचा:

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेच्या मृत्यूनंतर त्याचा साथीदार परमजीत सिंग उर्फ ​​धाडीला अटक!

उद्धव ठाकरे म्हणतात, लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या…

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांना गोळ्या घातल्या

थायलंडमध्ये बस अपघातात १४ जण ठार, २० जखमी!

पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाविरोधात आरोपपत्र दाखल केले आहेत. चेक गणराज्यमध्ये गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. गुप्ता यांना एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याने मदत केल्याचा देखील आरोप आहे. यासंबंधी माहिती समजताच भारताने तपासासाठी एक समिती स्थापन केलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा