कॅनडातून पुन्हा एकदा खलिस्तान समर्थकावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी एका खालिस्तानी समर्थकावर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ओटावा येथील एका खलिस्तान समर्थकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
स्थानिक वृत्तवाहिनी सीबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, रात्री बराच वेळ गोळीबाराचा आवाज येत होता. या गोळीबारात एका गाडीच्या दरवाजाचे नुकसान झाले आहे. तसेच गाडीच्या काचा फुटल्या आहेत. त्याचबरोबर घराच्या भिंतीवर आणि घरातही गोळ्यांचे निशाण उठले आहेत. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या घरावर हल्ला झाला ते घर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या एका मित्राचं आहे.
निज्जर याच्या मित्राचे नाव सिमरनजीत सिंह असून ते त्याचे घर होते. सिमरनजीत हा हरदीप सिंह निज्जरचा खास मित्र होता. जून २०२३ मध्ये हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर झालेल्या आरोप- प्रत्यारोपानंतर भारत आणि कॅनडामध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे. अद्याप हे वाद मिटलेले नाहीत.
हे ही वाचा:
झारखंडमध्ये चंपाई सोरेन सरकार!
अर्थसंकल्पावर महिंद्राना आनंद!
अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे हिचे कर्करोगाने निधन
वर्षभरात काही सिद्ध न झाल्यास जप्त केली मालमत्ता परत करा!
पोलीस सध्या सिमरनजीत सिंह यांच्या शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत. त्याचबरोबर सिमरनजीतच्या घराजवळच्या रस्त्यांवरील कॅमेऱ्यांचं फूटेज तपासत आहेत. रात्री झालेल्या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची पोलिसांनी पुष्टी केली आहे. ब्रिटिश कोलंबिया गुरुद्वारा परिषदेचे प्रवक्ते मोनिंदर सिंह म्हणाले की, “त्या घराचा मालक सिमरनजीत सिंह हा हरदीप सिंह निज्जरचा मित्र असल्यामुळेच त्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.”