29.7 C
Mumbai
Sunday, April 27, 2025
घरदेश दुनियाबांगलादेशाची अफगाणिस्तानच्या दिशेने वाटचाल? KFC, Pizza Hut, Bata वर जबर हल्ले

बांगलादेशाची अफगाणिस्तानच्या दिशेने वाटचाल? KFC, Pizza Hut, Bata वर जबर हल्ले

Google News Follow

Related

बांगलादेशात सोमवारी इस्रायलविरोधी निदर्शनांना हिंसक वळण लागले. या आंदोलकांनी इस्रायली संपर्क असलेल्या व्यवसायांवर हल्ले चढवले. देशभरात KFC, Pizza Hut आणि Bata सारख्या आस्थापनांवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी देशभरातून किमान ४९ जणांना अटक केली आहे.

बोगुरा, सिलहट आणि कॉक्स बाजार येथे सर्वाधिक तोडफोड झाल्याचे अहवाल समोर आले. बोगुरामध्ये Bata शो-रूमवर हल्ला झाला तर सिलहटमध्ये KFC रेस्टॉरंटवर हल्ला केला गेला. कॉक्स बाजारमध्ये KFC आणि Pizza Hut वर दगडफेक केली गेली. यामागी कारण म्हणजे गाझामधील इस्रायली आक्रमणाच्या निषेधार्थ सर्व स्तरांतील लोक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघटना, विद्यार्थी आणि व्यावसायिक रस्त्यावर उतरले होते.

ढाकामध्ये अमेरिकन दूतावासाबाहेर निदर्शने

ढाकामध्ये अमेरिकन दूतावासाजवळही निदर्शने झाली, जिथे सुरक्षा वाढवण्यात आली होती. निदर्शनांमध्ये अमेरिकाविरोधी घोषणा देखील दिल्या गेल्या आणि काही घोषणांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चिखलफेक करण्यात आली.

पोलीस महासंचालक बहारुल आलम यांनी संबंधित आरोपींना त्वरीत अटक करण्याचे आदेश दिले.  व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपी ओळखले जात असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले की, “कायदेशीर निदर्शनांवर बंदी नाही, परंतु हिंसाचार आणि तोडफोड सहन केली जाणार नाही.”

हे ही वाचा:

मद्यधुंद काँग्रेस कार्यकर्ता उस्मानने तिघांना चिरडले!

बुंदेलखंडच्या राय लोकनृत्याला जागतिक ओळख देणारे पद्मश्री राम सहाय पांडे यांचे निधन

वाईट जीनमुळे फुफ्फुसांमध्ये भोक होण्याचा धोका!

संयुक्त अरब अमिरातच्या उपपंतप्रधानांच्या भारत दौऱ्यातून काय साध्य होणार ?

हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मुहम्मद युनुस यांनी हिंसाचाराचा निषेध केला व पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीग याने या सगळ्या घडामोडींना देशात वाढणाऱ्या अतिरेकी प्रवृत्तींचे लक्षण म्हणत कठोर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “बांगलादेश अफगाणिस्तानसारखा होण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप केला नाही, तर त्याचे परिणाम प्रचंड गंभीर असतील.”

बांगलादेश गुंतवणूक विकास प्राधिकरण (BIDA) ने ही हिंसक निदर्शने देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका असल्याचे सांगत तीव्र निषेध केला. BIDA प्रमुख चौधरी अशिक महमूद बिन हारून यांनी म्हटले, “ही आस्थापने केवळ विदेशी नाहीत, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांचीही होती. त्यात हजारो युवकांना रोजगार मिळत होता.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा