पीटरसनने का मानले पंतप्रधान मोदींचे आभार?

पीटरसनने का मानले पंतप्रधान मोदींचे आभार?

दक्षिण आफ्रिकेत सध्या कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील देश अलर्ट मोवर गेले असून आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यास अनेक देशांनी सुरुवात केली आहे. मात्र, भारत संकटाच्या काळात आफ्रिकन देशांच्या कठीण समयी पाठिशी उभा राहिला आहे. भारत सरकारने ओमिक्रॉन प्रभावित झालेल्या आफ्रिकन देशांना कोरोना प्रतिबंधक लस, पीपीई किट आणि इतर साहित्य पुरवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचं क्रिकेटपटू केविन पीटरसन याने स्वागत केले आहे.

केविन पीटरसन हा इंग्लंडकडून क्रिकेट खेळला असला तरी तो मूळचा आफ्रिकन आहे. केविन पीटरसन याने ट्विट करत भारताच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. त्याने ट्विट करत म्हटले आहे की, भारताने पुन्हा एकदा संवेदना दाखवली आहे. भारत हा एक अद्भुत असा उदार लोकांचा देश आहे. त्याने भारताचे आभार मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले आहेत.

भारताने आफ्रिकन देशांना संयुक्त राष्ट्राच्या कोवॅक्स कार्यक्रमातंर्गत कोरोना प्रतिंबधक लसींचा पुरवठा करणार असल्याचे जाहीर केले आहे. कोविशिल्ड लसीचा पुरवठा मालावी, इथिओपिया, झांबिया, मोझाम्बिक यासह इतर देशांना करणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; काँग्रेसला दूर ठेवणार

पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ

‘महिला विरोधी आघाडी सरकारचं वस्त्रहरण’

न्यूझीलंडने चिवट झुंज देत पराभव टाळला

तसेच पीपीई किट आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणार असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे. तर, भारतानं आतापर्यंत आफ्रिकेतील ४१ देशांना २५ दशलक्ष कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे. एकीकडे जगात आफ्रिकन देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचे काम सुरु असताना आफ्रिकन देशांच्या मदतीसाठी उभे राहणे ही आपली जबाबदारी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Exit mobile version