केरळची महिला अबुधाबीमध्ये झाली मालामाल! वाचा सविस्तर

केरळची महिला अबुधाबीमध्ये झाली मालामाल! वाचा सविस्तर

अबू धाबीमध्ये राहणाऱ्या केरळच्या एका महिलेने कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. लीना जलाल असं लॉटरी जिंकणाऱ्या महिलेचं नाव आहे. ही भारतीय महिला ह्यूमन रिसोर्स अधिकारी म्हणून अबू धाबीमध्ये काम करते. लॉटरी लागल्यानंतर ही महिला मालामाल झाली आहे.

या महिलेने बिग तिकिट लॉटरीचे बक्षिस जिंकले आहे. लीना जलाल या केरळमधील त्रिशूर येथील रहिवाशी आहे. त्यांना बिग तिकिट लॉटरी अबुधाबी वीकली ड्रॉमध्ये तब्बल २२ दशलक्ष दिरहम म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे ४४ कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. या लॉटरीचा ड्रॉ ३ फ्रेब्रुवारीला काढण्यात आला होता. यामध्ये जलाल यांनी ही लॉटरी जिंकली. जेव्हा लॉटरी लागल्याचे कळाले तेव्हा प्रथम त्यांचाही यावर विश्वास बसला नाही. एवढी मोठी लॉटरी जिंकल्यावर त्या निशब्द झाल्या होत्या.

थोडी रक्कम समाजाला देणार

लीना यांना जेव्हा लॉटरीची माहिती मिळाली तेव्हा त्यांना हे खरे वाटले नाही, मात्र त्यांनी जेव्हा याची खात्री केली तेव्हा त्यांना अत्यानंद झाला. मात्र एवढी ४४ कोटी रक्कम त्या स्वतःसाठी ठेवणार नाहीत. जेव्हा त्यांना एवढ्या सगळ्या पैशाचे त्या काय करणार असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी उत्तर देताना सांगितले की, त्या ही रक्कम दहा लोकांमध्ये वाटप करणार असून, त्यातील एक वाटा चॅरिटी ट्रस्टला देखील देणार आहोत.

हे ही वाचा:

हृदयाची तार छेडणारा तारा निखळला

लता दीदींच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

लतादीदींना पडणारे ते स्वप्न कोणते होते? समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाला स्पर्श करत!

विशेष म्हणजे, या लॉटरीचे बक्षीस जिंकणाऱ्या लीना जलाल या एकमेव भारतीय महिला नव्हत्या तर केरळमधील आणखी एका अनिवासी भारतीयाने दहा लाख दिरहम म्हणजे समारे भारतीय रुपयानुसार अंदाजे दोन कोटी रुपये जिंकले आहेत. संबंधित व्यक्ती ही मलप्पुरम जिल्ह्यातील रहिवाशी आहे. आणि ही व्यक्तीसुद्धा लॉटरीची ही रक्कम २९ जणांसोबत शेअर करणार असल्याचे या व्यक्तीने सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही व्यक्ती अबुधाबीमध्ये अभियंता आहे.

Exit mobile version