कोरोना महामारीनंतर, ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता सतत वाढत आहे. चित्रपट, सिरीज प्रेक्षकांना सहज ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिळत आहेत. प्रेक्षकांवर ओटीटी प्लॅटफॉर्मची असलेली भुरळ पाहून केरळ राज्य सरकारने एक ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु करणार आहे. केरळचे सांस्कृतिक मंत्री साजी चेरियन यांनी बुधवार, १८ मे रोजी राज्य सरकारच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे.
‘सीस्पेस’ असं या ओटीटी प्लॅटफॉर्मच नाव आहे. १ नोव्हेंबरला केरळचा स्थापना दिन असतो. या दिनाचे औचित्य साधून ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केला जाणार आहे. यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य बनेल. यावेळी मंत्री साजी चेरियन यांनी सांगितले की, केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाने हे सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान लक्षात घेऊन तयार केले आहे. यामुळे मल्याळम चित्रपट उद्योगाला चालना मिळेल.
हे ही वाचा:
मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना न्यायालयाचा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर
‘सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार’
दर्जेदार वृत्तसंकेस्थळ म्हणून ‘न्यूज डंका’ चा गौरव
राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल
त्यांनी असेही सांगितले की, हे ओटीटी प्लॅटफॉर्म ‘पे पर व्ह्यू’ पद्धतीवर काम करेल, म्हणजे प्रेक्षकांना फक्त जे पाहायचं असेल त्याचेच पैसे द्यावे लागणार आहेत. यासोबतच व्ह्यूजवरील कमाईही चित्रपट निर्मात्यांना देण्यात येणार आहे. त्याच वेळी, चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, ते राज्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जातील. त्यावर फिचर फिल्म्ससह डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म्सही उपलब्ध असतील, ज्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांचाही समावेश असेल, असे मंत्री चेरियन यांनी सांगितले. या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी चित्रपटांची नोंदणी १ जून २०२२ पासून सुरू होणार आहे.