24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनिया‘द केरळ स्टोरी’ सुसाट; ३०० कोटींच्या क्लबकडे घोडदौड

‘द केरळ स्टोरी’ सुसाट; ३०० कोटींच्या क्लबकडे घोडदौड

जगभरातील उत्पन्नाकडे नजर टाकल्यास चित्रपटाने आतापर्यंत २७८.५० कोटींची कमाई केली आहे.

Google News Follow

Related

सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि अदा शर्मा अभिनीत ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शन होऊन २५ दिवस उलटले आहेत, तरी या चित्रपटाभोवतीचा वाद शमलेला नाही. तर, दुसरीकडे हा चित्रपट लवकरच ३०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल, असा अंदाज आहे. ३२ हजार महिलांना फूस लावून आयएस या दहशतवादी संघटनेत सहभागी करून घेतले जात असल्याचा दावा या चित्रपटात करण्यात आला होता. या मुद्द्यावरून अनेक वादविवाद सुरू असून काही राज्यांनी या चित्रपटावर बंदीही घातली आहे.

चित्रपटाने गेल्या २४ दिवसांत भारतात २२४.९७ कोटींची कमाई केली आहे. तर, २५व्या दिवशी अडीच कोटींची कमाई केली आहे. म्हणजे चित्रपटाची एकूण कमाई २२७.४७ कोटींपर्यंत पोहोचली आहे. तर, जगभरातील उत्पन्नाकडे नजर टाकल्यास चित्रपटाने आतापर्यंत २७८.५० कोटींची कमाई केली आहे. अजूनही जगभरातील अनेक चित्रपटगृहांत हा सिनेमा दाखवला जात असल्याने तो लवकरच ३०० कोटींची कमाई करेल, असे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

विद्या पराडकर यांच्या क्रिकेट प्रशिक्षणाचा गौरव

३५०व्या शिवराज्याभिषेकानिमित्त संगीतमय शिवस्वराज्यगाथा

एसबीआयकडे आल्या दोन हजारांच्या १४ हजार कोटी रुपयांच्या नोटा

१७०० कोटींच्या घोटाळ्याशी उद्धव ठाकरेंचा काय संबंध?

निर्मात्याला धमकी?

प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, मॉरिशसमधील एका थिएटर फ्रेंचायझीने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्याला पत्र पाठवले आहे. त्यात ‘द मॅकिन (चित्रपटगृहाचे नाव) उद्या नामशेष होईल. आम्ही चित्रपटगृहात बॉम्ब ठेवणार आहोत. तुम्हाला चित्रपट बघायचा आहे ना? उद्या आम्ही तुम्हाला खूप चांगला चित्रपट दाखवू’, असे या पत्रात नमूद केले आहे. मात्र चित्रपटाचे निर्माते विपुल शहा, दिग्दर्शक सुदिप्तो सेन किंवा चित्रपटाशी संबंधित अन्य कोणाही व्यक्तीने अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे पत्र मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा