24 C
Mumbai
Friday, January 3, 2025
घरदेश दुनियायेमेनकडून केरळच्या नर्सला फाशीची शिक्षा; सुटकेसाठी भारत सरकार मदत करणार

येमेनकडून केरळच्या नर्सला फाशीची शिक्षा; सुटकेसाठी भारत सरकार मदत करणार

निमिषा प्रिया या येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी २०१७ पासून तुरुंगात

Google News Follow

Related

येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल- अलिमी यांनी येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी २०१७ पासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या भारतीय परिचारिका निमिषा प्रिया यांना फाशीची शिक्षा मंजूर केली आहे. शिवाय एका महिन्याच्या कालावधीत फाशीची शिक्षा ठोठावण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, येमेनमध्ये निमिषा प्रिया यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेची कल्पना भारताला असून सरकार या प्रकरणात सर्व शक्य ती मदत करेल.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला समजले आहे की प्रिया यांचे कुटुंब संबंधित पर्यायांचा शोध घेत आहे. सरकार या प्रकरणात सर्व शक्य मदत करत आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या निमिषा प्रिया यांना जुलै २०१७ मध्ये येमेनी नागरिक तलाल अब्दो मेहदीच्या कथित हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. साना येथील एका ट्रायल कोर्टाने २०२० मध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावली. पुढे येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने नोव्हेंबर २०२३ मध्ये तिचे अपील फेटाळून लावले. ब्लड मनी म्हणजेच हत्या झालेल्याच्या कुटुंबियांना पैसे देऊन नुकसान भरपाई करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.

येमेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयामुळे निमिषा यांना मृत्यूदंडापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. निमिषा यांची आई प्रेमा कुमारी (वय ५७ वर्षे) या वर्षाच्या सुरुवातीला येमेनची राजधानी साना येथे पोहोचल्या होत्या. तेव्हापासून त्या निमिषा यांच्या फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी आणि पीडितेच्या कुटुंबासह ब्लड मनीमध्ये वाटाघाटी करण्यासाठी तिथेच राहिल्या आहेत.

प्रकरण काय?

निमिषा प्रिया या २०१७ मध्ये तलाल अब्दो महदी या येमेनी नागरिकाच्या हत्येसाठी दोषी आढळल्या होत्या. एक वर्षानंतर, त्यांना येमेनमधील एका ट्रायल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हापासून त्यांचे कुटुंब तिच्या सुटकेसाठी झगडत होते. त्यांनी ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरुद्ध येमिनी सुप्रीम कोर्टात संपर्क साधला, परंतु २०२३ मध्ये त्यांचे अपील फेटाळण्यात आले. आता, देशाच्या राष्ट्रपतींनी देखील प्रियाचे अपील फेटाळल्यामुळे, तिची सुटका पीडित कुटुंब आणि त्यांच्या आदिवासी नेत्यांकडून माफी मिळवण्यावर अवलंबून आहे.

निमिषा यांची आई, प्रेमा कुमारी या पीडितेच्या कुटुंबाशी ब्लड मनीमध्ये वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु भारतीय दूतावासाने नियुक्त केलेले वकील अब्दुल्ला अमीर यांनी प्री- निगोशिएशन फीची मागणी केल्यानंतर सप्टेंबरमध्ये पीडितेच्या कुटुंबाशी बोलणी अचानक ठप्प झाली. एमईएने जुलैमध्ये अमीरला आधीच १९,८७१ डॉलर्स प्रदान केले आहेत, परंतु त्यांनी बोलणी पुन्हा सुरू करण्यापूर्वी दोन हप्त्यांमध्ये देय असलेली एकूण ४०,००० डॉलर्स फीचा आग्रह धरला.

पलक्कड येथील रहिवासी असलेल्या निमिषा प्रिया या एक प्रशिक्षित नर्स असून तिने येमेनमधील खाजगी रुग्णालयात काही वर्षे काम केले. आर्थिक कारणांमुळे तिचा नवरा आणि अल्पवयीन मुलगी २०१४ मध्ये भारतात परतले. त्याच वर्षी, येमेन गृहयुद्धाने ग्रासले होते आणि नवीन व्हिसा देणे बंद केल्यामुळे ते परत जाऊ शकले नाहीत. नंतर २०१५ मध्ये, प्रियाने साना येथे तिचे क्लिनिक सुरू करण्यासाठी महदीचा पाठिंबा मागितला, कारण येमेनच्या कायद्यानुसार, क्लिनिक आणि व्यावसायिक संस्था स्थापन करण्याची परवानगी फक्त नागरिकांना आहे. महदी हा प्रिया यांच्यासह केरळला आला होता. या दरम्यान, त्याने तिचे लग्नाचे छायाचित्र चोरले आणि नंतर त्याने तिच्याशी लग्न केल्याचा दावा करण्यासाठी त्यामध्ये फेरफार केली. परत आल्यावर, प्रियाने क्लिनिक सुरू केल्यावर, महादीने तिच्या कमाईतील हिस्सा घेण्यास सुरुवात केली. तसेच क्लिनिकच्या मालकीच्या कागदपत्रांमध्येही फेरफार केली. निमिषा यांनी त्याला या घोटाळ्याबाबत विचारणा केली असता त्याने हे फेटाळून लावले. निमिषा आपली पत्नी असल्याचे सर्वांना सांगून त्याने तिच्या मासिक कमाईतून पैसे काढण्यास सुरुवात केली आणि आपण विवाहित असल्याचे दर्शविण्यासाठी त्यांचे फोटो मॉर्फ केले. प्रिया यांनी आपल्या याचिकेत आरोप केला की, छळाचे लवकरच शारीरिक छळ झाले आणि महदीने तिचा पासपोर्टही जप्त केला.

हे ही वाचा : 

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये सापडले ४४ वर्षांपासून बंद असलेले शिव मंदिर!

… म्हणून प्रियांका वाड्रा यांनी गृहमंत्री शाहांचे मानले आभार

गाझियाबादमध्ये चमत्कार! वीज पडलेल्या शेतातील खड्ड्यात सापडले ‘शिवलिंग’

धक्कादायक! मालेगावात १,००० रोहिंग्या, बांगलादेशींना दिले जन्म दाखले!

प्रिया यांनी या प्रकरणाबाबत सना येथील पोलिसांशी संपर्क साधला, परंतु पोलिसांनी महदीवर कारवाई करण्याऐवजी प्रिया यांना अटक केली आणि सहा दिवस तुरुंगात टाकले. दरम्यान, सुटका झाल्यावार प्रिया यांनी त्यांचा पासपोर्ट मिळवण्यासाठी काही औषध महदी याला दिले, परंतु औषधाच्या ओव्हरडोजमुळे काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा