चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याचा दावा केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांचे निकटवर्तीय डेनिस इत्सुम्बी यांनी केला आहे. याचा आरोप डेनिस यांनी गुन्हे अन्वेषण संचालनालयाच्या भंग करण्यात आलेल्या एसएसयू विभागावर ठेवला आहे.
रुटो यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या मोहिमेच्या यशात झुल्फिकार अहमद खान आणि त्यांचे मित्र मोहम्मद झैद सामी किडवाई यांचे मोठे योगदान असल्याचे डेनिस यांनी म्हटले आहे. तो केनिया क्वान्झा डिजिटल कॅम्पेन टीमचा भाग होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोन भारतीयांच्या बेपत्ता होण्यामागे एसएसयू या डीसीआयच्या युनिटचा हात असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर अध्यक्षांनी एसएसयू विसर्जित करण्याचा आदेश जारी केला होता. एसएसयूवर अनेक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी
पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू
इस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
संघटनेत काम करणाऱ्या एकूण २१ हेरांना २१ ऑक्टोबर रोजी नैरोबी येथील इंटरनल अफेअर्स युनिट मुख्यालयात बोलावण्यात आले होते. या दोघांची हत्या झाल्याची माहिती समोर आली होती असं ‘द नेशन’च्या वृत्तात म्हटलं आहे. झुल्फिकार अहमद खान आणि त्याचा मित्र मोहम्मद झैद सामी किडवाई हे स्थानिक टॅक्सी चालक निकोडेमस मावानियासह मोम्बासा रोडवरून बेपत्ता झाले होते. या तिघांना २३ जुलैच्या रात्री वेस्टलँड्समधील नाईट क्लबला भेट देताना दिसले होते.