खलिस्तानी अतिरेकी आणि सिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू याने एका ताज्या व्हीडिओत आम आदमी पक्षावर आरोप केला आहे. या पक्षाला खलिस्तानी संघटनांनी १६ दशलक्ष डॉलर इतकी रक्कम निधी म्हणून दिल्याचे त्याने म्हटले आहे. दिल्लीत सरकार बनल्यानंतर पाच तासांच्या आत खलिस्तानी दहशतवादी प्रो. देविंदर पाल सिंग भुल्लर याला सोडण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचा दावाही पन्नू याने केला आहे.
पन्नूने सांगितले की, केजरीवाल आणि त्यांचे सहकारी जे स्वतःला प्रामाणिक हिंदू म्हणवतात ते अप्रमाणिक हिंदूपेक्षाही अधिक धोकादायक आहेत. २०१४मध्ये जेव्हा केजरीवाल दिल्लीच्या सत्तेत आले तेव्हा ते अमेरिकेत आले होते. तेव्हा त्यांनी खलिस्तानी संघटनातील सदस्यांची भेट घेतली. तेव्हा सरकार आल्यानंतर पाच तासांच्या आत देविंदर भुल्लर याला सोडण्याचे वचन त्यांनी दिले होते. तेव्हा आम्ही त्या संघटनांना सावध केले की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आज केजरीवाल सत्तेत येऊन ९ वर्षे लोटली आहेत.
हे ही वाचा:
ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ओमर अब्दुल्लाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न!
प्रभू रामललाने भव्य महालात साजरी केली होळी!
भाजपने वरुण गांधी यांचे नाव वगळले; आई मनेका गांधी यांची जागा कायम!
अभिनेत्री कंगना रणौत, अरुण गोविल भाजपच्या पाचव्या यादीत!
पन्नूने पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमीचे नेते भगवंत मान यांच्यावरही आरोप केला. पंजाबमधील खलिस्तानच्या बाजूने जे बोलतील त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील असे मान बोलत असत पण याच आम आदमी पार्टीने २०१४पासून या पक्षाला सरकार स्थापनेसाठी १४ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रक्कम निधीस्वरूपात दिलेली आहे, असे पन्नूने म्हटले आहे.
पन्नूने केजरीवाल यांना इशारा दिला आहे की, तुरुंगात असलेले खलिस्तानी तुमचा योग्य समाचार घेतील. भुल्लर याची सुटका का केली गेली नाही, याचा जाब ते विचारतील. जे खलिस्तानींच्या बाजूने बोलतील त्यांच्याविरोधात गुन्हे का दाखल करण्यात आले याचीही उत्तरे मागितली जातील.
याआधीही पन्नूने आप पक्षावर आरोप केलेले आहेत. २०२२मध्ये सिख फॉर जस्टिसने भगवंत मान यांना पत्र पाठवले होते. तेव्हा मान हे मुख्यमंत्री बनणार होते. त्यात म्हटले होते की, केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आप पक्षाने खलिस्तानी मते आणि निधी यांचा पंजाबच्या निवडणुका जिंकण्यासाठी वापर केला.
पन्नूने म्हटले की, खलिस्तानी चळवळीला बळ मिळण्यासाठी २०२२ची निवडणूक महत्त्वाची आहे आणि त्यात पंजाबमध्ये आपचे सरकार येणेही अनिवार्य आहे, असे आम आदमी पक्षाकडून वारंवार सांगितले जात असे.