काश्मीरमध्ये श्रीकृष्णजन्माष्टमीचा उत्साह; महाराष्ट्रात मात्र मंदिरे बंद

काश्मीरमध्ये श्रीकृष्णजन्माष्टमीचा उत्साह; महाराष्ट्रात मात्र मंदिरे बंद

ज्या काश्मीरमध्ये दहशतवादाने उच्छाद मांडला होता, लाल चौकात पाकिस्तानी झेंडे फडकाविले जात. त्याच काश्मीरात आता ३७० कलम हटविल्यावर झालेले आमूलाग्र बदल नव्या युगाची नांदी ठरत आहेत. श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने काश्मीरचा हाच लाल चौक श्रीकृष्ण भक्तीने न्हाऊन निघाला.

एकीकडे काश्मीरसारख्या एकेकाळी अशांत असलेल्या प्रदेशातही कोरोनाचे निर्बंध पाळून श्रीकृष्णजन्माष्टमी साजरी केली गेली पण महाराष्ट्रात मात्र मंदिरे बंद आहेत. त्यामुळे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशीही वातावरण सुने होते.

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त श्रीनगरमधील लाल चौकातून मिरवणूक काढून ती शहरातील मुख्य बाजारपेठांमधून  फिरवण्यात आली. या मिरवणुकीत हरे रामा हरे कृष्ण या संस्थेच्या अनुयायांनी भगवान श्रीकृष्णाचा जप करत काश्मीरमधील वातावरण भक्तिमय केले. ही मिरवणूक ज्या ज्या बाजारपेठेतून गेली तेथील उपस्थित लोकांनी उत्साहात आणि मनापासून मिरवणुकीचे स्वागत केले.

काश्मीरमधून ३७०चा कलम हटवल्यापासून काश्मीरमध्ये अनेक चांगले बदल अनुभवयास मिळत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काश्मीरला तिरंग्याचा साज चढला होता. आज काश्मीरमधील सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे लाल चौक इथून श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिनी मिरवणूक काढण्यात आली. याच लाल चौकात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंग्याची रोषणाई केली होती.

काश्मिरी पंडितांनी आजच्या शुभ दिनी लाल चौकातून सुरू केलेली मिरवणूक श्रीनगरमधील बाजारपेठांमध्येही फिरवण्यात आली. मिरवणुकीच्या वेळी शहरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. स्थानिक लोकांनीं मिरवणुकीचे स्वागत करून हा एक नवीन काश्मीरचा शुभ संदेश आहे, अशा भावना व्यक्त केल्या. आज या शोभा यात्रेमध्ये सहभागी होता आले याहून मोठे भाग्य नाही, अशा भावना काश्मिरी पंडित राकेश रैना यांनी व्यक्त केल्या. मिरवणूकीची सुरुवात श्रीनगरमधील हब्बकदल शहरातील गनपथेयार मंदिरातून होऊन, शहरातील मुख्य बाजारपेठ फिरून मिरवणुकीची सांगता झाली.

हे ही वाचा:

आता श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिराची प्रतीक्षा

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची का केली ईडीने चौकशी? वाचा…

मराठी माणसाला एकत्र येऊ द्यायचे नाही, म्हणूनच दहीहंडीला विरोध आहे का?

पुन्हा भालाफेकीत भारताला मिळाले सुवर्ण; सुमित अंतिलची जबरदस्त कामगिरी

काश्मिरी पंडितांनी दोन वर्षांनंतर ही मिरवणूक काढली. यापूर्वी त्यांनी २०१८ मध्ये मिरवणूक काढली होती. २०१८ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी निर्बंधांमुळे गर्दी कमी होती. २०१९ मध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता, त्यामुळे मिरवणूक काढता आली नव्हती. २०२० मध्ये कोरोनाच्या प्रभावामुळे मिरवणूक काढता आली नव्हती. यावर्षी मात्र कमी लोकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली होती.

Exit mobile version