जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीवर पडला पडदा, चित्रपटाचा पडदा उघडला

२३ वर्षांनी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पुलवामा आणि शोपियानमध्ये एक बहुउद्देशीय सिनेमा हॉल सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीवर पडला पडदा, चित्रपटाचा पडदा उघडला

१९८९-९० मध्ये दहशतवाद्यांच्या धमक्या आणि हल्ल्यांमुळे थिएटर मालकांनी काश्मीर खोऱ्यातील घाटीतील सिनेमा हॉल बंद केले होते. पण जम्मू-काश्मीरमधून घटनेतील ३७० कलम हटवल्यानंतर खोऱ्यात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आता तब्बल २३ वर्षांनी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पुलवामा आणि शोपियानमध्ये एक बहुउद्देशीय सिनेमा हॉल सुरू झाला आहे. कोणे एकेकाळी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत बंदुकीच्या गोळ्यांनी खोरे हादरून जायचे पण आता याच खोऱ्यातील लोकांना फिल्मी गाण्यांचे मधुर झंकार ऐकायला मिळणार आहेत . लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला.

सरकार लवकरच अनंतनाग, श्रीनगर, बांदीपोरा, गांदरबल, डोडा, राजौरी, पूँछ, किश्तवाड आणि रियासीमध्ये असे बहुउद्देशीय सिनेमा हॉल उघडणार आहे. यावेळी मनोज सिन्हा म्हणाले की, या सिनेमागृहांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच इन्फोटेनमेंटचेही अनेक शो होणार आहेत. तरुणांचा कौशल्य विकासही होईल. ‘मिशन यूथ’ अंतर्गत जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक जिल्ह्यात असेच बहुउद्देशीय सिनेमा हॉल सुरू केले जाणार आहेत. संस्कृती, मूल्ये आणि आकांक्षा दाखवण्यासाठी सिनेमा हे एक सशक्त आणि सर्जनशील माध्यम आहे. जम्मू-काश्मीरचे चित्रपट जगताशी जुने नाते आहे. नवीन चित्रपट धोरण आणि सुविधांमुळे ते पुन्हा एकदा सर्वोत्तम शूटिंग डेस्टिनेशन बनवण्याचे काम सुरू आहे. यातून कौशल्य विकासाबरोबरच येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा:

पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले

“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन

मल्टिप्लेक्सचा मालक एक काश्मिरी हिंदू विकास धर आहे, ज्यांनी दहशतवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता काश्मीरमधून पलायन केले नाही, तर आपल्या मुळाशी जोडलेल्या काश्मीरमध्ये नवीन पहाट उगवण्यासाठी रात्रंदिवस काम केले. या ठिकाणी बांधलेला पहिला ब्रॉडवे सिनेमाही विकास धर यांचाच होता. विकास धर यांच्या कंपनी टॅक्सल हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडने मार्च २०२० मध्ये मल्टिप्लेक्ससाठी अर्ज केला होता आणि राज्य सरकारने जून २०२० मध्ये परवानगी दिली होती.

असे आहे मल्टिप्लेक्स

हे मल्टिप्लेक्स आयनॉक्स ने बांधले आहे मल्टिप्लेक्समध्ये तीन स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. एकूण ५२० प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. या मल्टिप्लेक्सची रचना आधुनिक सजावट आणि काश्मिरी कला यांच्या मिश्रणाने करण्यात आली आहे. प्रत्येक चित्रपटगृहात अद्ययावत साऊंड सिस्टीम बसवण्यात आल्या आहेत. मल्टिप्लेक्समधील फूड कोर्ट आणि मनोरंजनाची ती सर्व साधने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून व्यवस्था करण्यात आली आहे.

Exit mobile version