कर्नाटक राज्यसरकार खरेदी करणार कोविड लसीचे १ कोटी डोस

कर्नाटक राज्यसरकार खरेदी करणार कोविड लसीचे १ कोटी डोस

देशात लसीकरण मोठ्या जोमाने सुरू आहे. १ मे पासून संपूर्ण देशात सर्व प्रौढ नागरिकांचे म्हणजेच १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने १ कोटी डोसेस खरेदी करण्यासाठी मागणी नोंदवली आहे. कर्नाटकात १८-४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस पुरवण्यात येणार आहे.

सरकारने काढलेल्या पत्रकानुसार १ मे पासून १८-४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण संपूर्ण देशात करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य सरकारने १ कोटी डोसेसची मागणी नोंदवली असल्याचे कळले आहे.

हे ही वाचा:

सुनील मानेकडे प्रियदर्शनी पार्क ते अँटेलियाचे नकाशे

परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल

आता अमेरिकेकडून मदतीचा महापूर

लसीकरणासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा

यामध्ये नेमक्या कोणत्या लसींची मागणी नोंदवली आहे, ते नेमकं कळलं नसलं तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मागणी पुणे- स्थित सिरमची कोविशिल्ड आणि हैद्राबादच्या कोवॅक्सिनची असू शकते असे सांगितले जात आहे.

दोन्ही उत्पादकांकडून डोसेस पोहोचले की मग लसीकरणाला सुरूवात केली जाईल असे एका अधिकाऱ्याकडून कळले. मात्र नेमक्या कोणत्या तारखेला लसीकरण सुरू होईल याबाबत काही भाष्य केले नाही.

राष्ट्रीय पातळीवर १८-४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याने कालपासून कोविन या ॲपवर अनेकांनी नोंदणी केलेली पहायला मिळाली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे या ॲपचा सर्व्हर बंद झाला होता.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी २२ एप्रिल रोजी सांगितले होते, की सरकार १ कोटी लसींचे डोस खरेदी करणार आहे. त्यासाठी ४०० रुपये प्रतिडोस या दराने खरेदी केली जाणार आहे.

देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने लसीकरणाचा वेग वाढवायला घेतला आहे. त्याचा भाग म्हणून केंद्र सरकारने १ मे पासून १८-४४ या वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच इतर चार लसींना देखील भारत सरकारने मान्यता दिली आहे.

Exit mobile version