25 C
Mumbai
Tuesday, January 14, 2025
घरदेश दुनियाजगातील सर्वांत वाईट शहरांमध्ये पुन्हा कराची

जगातील सर्वांत वाईट शहरांमध्ये पुन्हा कराची

पाचव्या क्रमांकावर समावेश

Google News Follow

Related

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने (ईआययू) नुकतीच जगातील राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्वांत पाच वाईट शहरांमध्ये कराचीचा समावेश झाला आहे.

ईआययूने राहण्यायोग्य देशांच्या यादीत १७३ देशांचा समावेश केला आहे. त्यामध्ये पाकिस्तानमधील कराची शहर १६९व्या स्थानावर आहे. तर, लागोस या शहराला १७० वे स्थान मिळाले आहे. तर, अल्जीयर्स १७१ व्या आणि त्रिपोली १७२ व्या स्थानावर आहे. तर, सिरियामधील दमिश्क शहराला तळाचे स्थान मिळाले आहे. याही आधी सन २०१९ मध्ये कराचीला १४० व्या देशांच्या यादीत १३६ वे स्थान मिळाले होते. नंतर २०२० व २०२१ मध्ये करोनाकाळात अशी कोणतीही यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यानंतर २०२२ मध्ये १४० व्या देशांच्या यादीत कराचीचा १३४ वा क्रमांक आला होता.

या यादीत देशांना १०० पैकी गुण दिले जातात. जर एखाद्या शहराला एक गुण मिळाला असेल तर याचा अर्थ या शहरात राहणे अशक्य आहे. तर, १०० गुण मिळणारा देश सर्व सुखसुविधांनी सज्ज आहे, असे म्हणता येईल. या यादीत कराचीला ३७.५ गुण मिळाले आहेत. त्यामध्ये स्थैर्य २० गुण, वैद्यकीय सुविधांसाठी ३३, संस्कृतीसाठी ३५, शिक्षणात ५५ आणि पायाभूत सुविधांमध्ये ५१ गुण मिळाले आहेत.

हे ही वाचा:

कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी

कोविड घोटाळ्याप्रकरणी एसआयटीकडून मुंबई महापालिकेत चौकशी

वैमानिक अत्यवस्थ झाल्यानंतर महिला प्रवाशाने उतरविले विमान

भारत इंडोनेशियात आता डिजिटल तंत्रज्ञान व्यवहार

ईयूव्हीचा संशोधन आणि विश्लेषण विभागाने करोनासाथीनंतर पूर्ववत झालेल्या परिस्थितीवर लक्ष्य केंद्रित केले होते. त्यामध्ये स्थैर्य, आरोग्यसुविधा, संस्कृती व पर्यावरण, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या पाच मुख्य सुविधांचा समावेश होता. विदेशी चलनाची गंगाजळी आटल्यामुळे पाकिस्तानमध्ये अभुतपूर्व महागाई वाढली आहे. पाकिस्तानमध्ये एक किलो पिठासाठी १६० रुपये खरेदी करावे लागत आहेत. तसेच, पाकिस्तान नेहमीच कराचीला आधुनिक सुविधांनी युक्त असे शहर असल्याचा दावा करते. मात्र या यादीमुळे त्यांच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा