अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून तालिबानच्या क्रुरतेचा एक व्हिडीओ समोर आलाय. काबुल विमानतळात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अश्वका न्यूजने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओत एक नागरिक विमानतळाच्या भिंतीवर चढून विमानतळात जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी खालून काळ्या कपड्यातील एक बंदुकधारी या नागरिकाच्या दिशेने गोळी धाडतो. यानंतर हा नागरिकही भिंतीवरुन खाली पडतो.
संबंधित वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे, “काबुल विमानतळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवर तालिबानच्या व्यक्तीने गोळीबार केला. या व्यक्तिला तालिबानी मागील सरकारच्या पोलिसांप्रमाणे वागतील असं वाटलं, पण तालिबानी वेगळीच भाषा (बंदुकीची) बोलतात.”
Taliban Fighter shooting on a man trying to enter to the #kabulairport, He actually expected the Taliban to behave like the police of the previous Government, while No, Taliban speak another language of behavior. pic.twitter.com/3T8tcl4joY
— Aśvaka – آسواکا News Agency (@AsvakaNews) August 17, 2021
भारतीय हवाई दलाच्या सी-१७ विमानातून १२० भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान १७ ऑगस्टला सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं. मायदेशी परत आणले गेलेले सर्व अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी होते. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी करण्यात आलं आहे. गुजरातच्या जामनगर येथे या विमानातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
हे ही वाचा:
पोलीस महासंचालकांचेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट
विवेक पाटीलांना ईडीचा दणका…२३४ कोटींची मालमत्ता जप्त
आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?
अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला
अफगाणिस्तानातून परत आलेल्या लोकांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आलं. तिथून बस द्वारे त्यांना पुढे पाठवण्यात आले. यावेळी लोकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती बिघडत चालली असल्यामुळे सोमवारी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, अमेरिकी सैन्य दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून विमानतळ सुरू झालं. यानंतर भारतीय विमानाने तिथून उडाण केलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय नागरिकांना आपल्या देशात परत आणलं गेलं.