22 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरदेश दुनियाकाबुल विमानतळ बंद

काबुल विमानतळ बंद

Google News Follow

Related

अफगाणिस्तानातील परिस्थिती सध्या चिघळत असल्याने, काबुलचा विमानतळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तिथे अडकून पडलेल्या हजारो लोकांच्या सुटकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विमानतळ बंद करण्यात आल्याने काबुलकडे जाणारे एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आले आहे.

भारत सरकार तिथे घडत असलेल्या घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याबरोबरच काबुलच्या विमानतळाबाबत तालिबानचे धोरण काय असेल याकडे देखील भारत सरकारचे लक्ष आहे. काबूलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरीकांना या परिस्थितीत वाचवण्यासाठी, ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरता योजना आखत आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखला भागौडा घोषित करा

कोंबड्याचे ‘कुकू च कू’, नी कश्मीरातील पहाट

मेघालयात ‘या’ कारणासाठी गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा

जुहू समुद्रात या जलचराचे आक्रमण

भारत सरकारकडून आपल्या नागरीकांच्या बचावाचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय दुतावासाने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना भारतात परत न्यायला सुरूवात केली आहे. त्याबरोबरच अफगाणिस्तानात असलेल्या भारतीय नागरीकांचे आयुष्य धोक्यात टाकणार नसल्याचे देखील कळले आहे. तेथील बदलत्या परिस्थिती पाहून भारत सरकार योजना आखत आहे. या नागरीकांना आपात्कालिन परिस्थितीतही वेगाने अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याच्या तयारीत आहे.

भारताने यापूर्वीच आपल्या काही नागरीकांना वाचवले आहे. सुमारे १२९ नागरीकांना घेऊन एक विमान काबुलहून एक विमान नवी दिल्ली विमानतळावर रविवारीच सकाळी उतरले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा