अरबी समुद्रातील तटरक्षक दलाला नवीन प्रमुख मिळाले आहेत. गुजरात ते कन्याकुमारी या अरबी समुद्री क्षेत्रातील सुरक्षेला कंदम्बक्कम रामाणी सुरेश असे त्यांचे नाव असून ते संपूर्ण क्षेत्राचे तटरक्षक दल प्रमुख (अतिरिक्त महासंचालक) या नात्याने बुधवारी पदभार स्वीकारला आहे. तटरक्षक दलात १९ जानेवारी १९८७ रोजी रुजू झाले. संप्रेषण आणि इलेक्ट्रॉनिक युद्धातील तज्ञ असून त्यांना प्रदीर्घ कामाचा अनुभव आहे. त्यांनी चेन्नईच्या मद्रास विद्यापीठातून संरक्षण धोरणात्मक अभ्यासात एम.फिल पदवी देखील घेतली आहे.
तटरक्षक क्षेत्राला दोन दिवसापूर्वी महानिरीक्षक या नात्याने मनोज बाडकर हे प्रमुख मिळाले आहेत. तर आता संपूर्ण अरबी समुद्र क्षेत्राचे प्रमुख के. सुरेश असतील. तसेच के. सुरेश यांना तटरक्षक दलातील विविध नौका तसेच, विविध कार्यालयीन कामाचा अनुभव आहे. त्याखेरीज ते इलेट्रॉनिकस युद्धपद्धतीमध्ये कुशल आहेत. त्यासाठी त्यांनी नौदलाच्या उच्च दर्जाचे अभ्यासक्रम उत्तीर्ण केले आहेत. तसेच एम,एस्सी आणि एम फील हे शिक्षण ही मिळवले आहे. तटरक्षक दल पदक व राष्ट्रपती तटरक्षक दल पदकाने ते सन्मानित आहेत.
हे ही वाचा:
जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला
वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात, वेदांताच्या अध्यक्षांची घोषणा
सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला
वसईत दोन मातांनी एकाच दिवशी केले ‘अवयवदान’
तटरक्षक दलाच्या पश्चिम समुद्र क्षेत्रात संपूर्ण अरबी समुद्राचा समावेश होतो. त्यामध्ये वायव्य क्षेत्र व पश्चिम क्षेत्र अशी दोन क्षेत्रे आहेत. तर यामध्ये वायव्य क्षेत्र गुजरातसाठी आहे तर पश्चिम क्षेत्रात दमण ते कन्याकुमारीपर्यंतचा भागाचा समावेश होतो. तसेच के. सुरेश यांना कामाचा ३५ वर्षाचा अनुभव असून त्यांना या अगोदर अनेक महत्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यात आले होते.