इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धानंतर कॅनडाच्या ट्रुडोंचा बनावट चेहरा आला समोर

हमासला विरोध करणारे ट्रुडो खलिस्तानविरोधात मात्र गप्पच

इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धानंतर कॅनडाच्या ट्रुडोंचा बनावट चेहरा आला समोर

Canada's Prime Minister Justin Trudeau pauses while responding to questions after delivering an apology in the House of Commons on Parliament Hill in Ottawa, Ontario, Canada, May 19, 2016 following a physical altercation the previous day. (Chris Wattie/Reuters)

इस्रायलने पॅलेस्टाइनवर प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केल्यानंतर आता अनेक देशांनी इस्रायलच्या समर्थनार्थ संदेश द्यायला सुरुवात केली आहे. मात्र पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासच्या समर्थनार्थही अनेक लोक पुढे सरसावले आहेत.

कॅनडातही हमासच्या समर्थनासाठी काही समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रुड़ो यांनी इशारा दिला आहे आणि दहशतवाद तसेच हिंसाचाराचे कधीही समर्थन खपवून घेतले जाणार नाही. कोणत्याही गटाकडून किंवा कोणत्याही परिस्थितीत असे समर्थन सहन केले जाणार नाही, असे ट्रुडो यांनी म्हटले आहे.

 

मात्र त्यामुळे ट्रुडो यांच्या दुतोंडी भूमिकेवर आता टीका होऊ लागली आहे. एकीकडे कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत एकही शब्द ट्रुडो उच्चारत नाहीत पण हमासच्या दहशतवादी कारवायांबद्दल मात्र ते संताप व्यक्त करतात, यावर आता बोलले जाऊ लागले आहे.

 

ट्रुडो यांनी कॅनडात हमासच्या समर्थनार्थ होत असलेल्या मोर्चांबद्दल म्हटले आहे की, कॅनडात हिंसाचाराचे उदात्तीकरण अजिबात खपवून घेतले जाणार नाही. मी अशा समर्थनाची कठोर शब्दांत निंदा करतो. दहशतवादाच्या विरोधात आपण एकत्रितपणे लढले पाहिजे.

हे ही वाचा:

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीची फसवणूक

शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल

३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालये उभारण्यासाठी आराखडा तयार करा

दिलासादायक! इस्रायलमधील १८ हजारांहून अधिक भारतीय सुरक्षित

 

कॅनडाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या या भूमिकेवर आता भारतीयांनी सडकून टीका केली आहे. कॅनडात बहरलेल्या खलिस्तानी दहशतवादी चळवळीच्या विरोधात मात्र कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष एक शब्दही बोलत नाहीत. उलट भारताविरोधात खलिस्तानी चळवळीच्या कारवायांना अप्रत्यक्षपणे समर्थन देतात.

 

भाजपाच्या नेत्या वैशाली पोद्दार यांनी ट्रुडो यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अखेर तुम्ही जागे झालात. कॅनडात इंदिरा गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची प्रतिकृती दाखवत मिरवणूक काढणाऱ्यांबद्दल तुमची भूमिका काय आहे. तुम्ही कॅनडाला दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनविले आहे. त्यामुळे दुसऱ्यांना शिकवू नका, स्वतः काहीतरी कृती करा.

 

यावर्षी जून महिन्यात इंदिरा गांधी यांच्या हत्येची प्रतिकृती करून त्याचे प्रदर्शन कॅनडात करण्यात आले होते. भारताने त्याचा निषेध केला होता. खलिस्तानींनी भारतीय दुतावासावर अनेकवेळा हल्ले केले, हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे केली, त्याची विटंबना केली, पण त्यावेळी ट्रुडो यांनी एक शब्दही या दहशतवादाविरोधात उच्चारला नाही. त्यामुळे जस्टिन ट्रुडो हे मतांच्या राजकारणासाठी खलिस्तानी दहशतवादाचेही समर्थन करत असल्याचे समोर आले. भारताने तेही ट्रुडो यांना दाखवून दिले.

Exit mobile version