कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत कॅनडाचा नागरिक आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला होता. या वक्तव्याने खळबळ माजली असून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. त्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही भारतीय दूतावासातील एका उच्चस्तरीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टीही केली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर ट्रुडो यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
‘भारत सरकारचे एजंट आणि शीख दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या या दोहोंशी संबंध जोडून भारताला चिथवण्याचा कोणताही विचार नसल्याचे ट्रुडो यांनी स्पष्ट केले आहे. ‘भारत सरकारने याची दखल घेण्याची गरज आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आम्ही असा दावा करून भारताला चिथवण्याचा आमचा अजिबातच विचार नाही,’ असे ट्रूडो यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
नागपूर विमानतळावर ८७ लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक !
मोदी सरकारच्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठींबा
नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर..
कॅनडाच्या पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर एकच खळबळ उडाली आहे. ‘गेल्या काही आठवड्यांपासून, कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणा भारत सरकारचे एजंट आणि कॅनेडियन नागरिक हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येतील संभाव्य संबंधांचा पाठपुरावा करत आहेत,’ असे ट्रूडो यांनी हाऊस ऑफ कौन्सिलमध्ये केलेल्या भाषणात नमूद केले होते.
कॅनडा सरकारने भारतीय दूतावासातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचीही हकालपट्टी केली आहे. भारताने हे आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत. ‘कॅनडातील हिंसाचाराच्या कोणत्याही कृतीत भारत सरकारचा सहभाग असल्याचे आरोप मूर्खपणाचे आणि कोणत्या तरी विशिष्ट हेतूने प्रेरित आहेत,’ असे स्पष्टीकरण भारतातर्फे देण्यात आले आहे.