दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षिवर्षाच्या सुरुवातीलाच जोशीमठ शहराचा ३० टक्के भाग भूस्खलनाच्या तडाख्यात आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यटकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. .भूस्खलनामुळे ३० टक्के हॉटेल आणि निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे. परंतु शहराचा ७० टक्के भाग चारधाम यात्रेसाठी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंहधर वॉर्ड, जोशीमठचे प्रवेशद्वार आणि त्याजवळील मनोहर बाग, मारवाडी, सुनील वॉर्डचा काही भाग भूस्खलनाच्या तडाख्यात सापडला होता . पण आता बाधित भागात भूस्खलन कमी झाले आहे. त्यामुळे जोशीमठमधील अनेक ठिकाणे प्रवासासाठी सुरक्षित आहेत. यावर्षी बद्रीनाथ धामचे पोर्टल २७ एप्रिल रोजी सकाळी ७.१० वाजता यात्रेकरूंसाठी उघडले जाणार असून त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. यात्रेसाठी दररोज सुमारे ३,००० यात्रेकरू आणि पर्यटकांच्या मुक्कामाची संपूर्ण व्यवस्था आहे.
जोशीमठ शहर हे बद्रीनाथ धामचे प्रवेशद्वार आहे. रात्रीच्या मुक्कामासाठी यात्रेकरू जोशीमठला पोहोचतात आणि सकाळी नरसिंह मंदिराला भेट दिल्यानंतर बद्रीनाथ धामकडे प्रवास सुरू करतात. गेल्या वर्षात एक दिवसात सुमारे ५,००० यात्रेकरू रात्रीच्या मुक्कामासाठी जोशीमठला येत होते.बद्रीनाथपासून कमी अंतर असल्यामुळे बहुतेक यात्रेकरू रात्री मुक्कामासाठी जोशीमठ आणि पिपळकोटी येथे पोहोचतात. पिपळकोटी मध्ये २५०० ते ३,००० यात्रेकरूंची राहण्याची सोय आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडे आहे हे ब्रह्मास्त्र !
शनि शिंगणापूरला १ कोटीचे दान करणारे ओदिशाचे मंत्री नबा दास गोळीबारात मृत्यूमुखी
अर्थसंकल्पात या गोष्टींमध्ये दिलासा मिळण्याचे संकेत
ठाकरे गट हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे?
जोशीमठमधील ७० टक्के लोक सामान्य जीवन जगत आहेत आणि जवळील बद्रीनाथ आणि औलीचे रस्ते पूर्णपणे खुले आहेत. चार धाम यात्रा पूर्वीप्रमाणेच सुरक्षितपणे पार पडेल. गेल्या हंगामात यात्रेसाठी विक्रमी संख्येने भाविक आले होते. या वर्षीही यात्रेकरूंसाठी सर्व व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिले आहे.