भारत आणि कझाकस्तान या दोन देशांमध्ये हा संयुक्त युद्धाभ्यास पार पडला. ‘काझींद २१’ असे या युद्धाभ्यासाचे नाव आहे. या युद्धाभ्यासाचे हे ५ वे वर्ष होते. कझाकस्तान येथील आयेशा बीबी येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. एकूण १२ दिवस हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होता. ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत हा कार्यक्रम पार पडला.
३१ ऑगस्ट २०२१ रोजी या संयुक्त सरावाला सुरुवात झाली. शहरी परिस्थितीतील घुसखोरी विरोधातील आणि दहशतवादाच्या विरोधातील कारवाया तसेच शस्त्रास्त्रांमधील कौशल्ये सामायिक करण्यावर या प्रशिक्षण केंद्रीत होते. या अभ्यासानुसार दोन्ही सैन्याच्या सैन्याला चिरंतन व्यावसायिक आणि सामाजिक संबंध वाढवण्याची संधी देखील मिळाली.
हे ही वाचा:
ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी
तालिबानच्या कब्जानंतर राशिद खानचा राजीनामा
सापडले १५०० वर्षापूर्वीचे गुप्त काळातील मंदिराचे अवशेष
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली
१२ दिवसांच्या या अतिशय खडतर अशा प्रशिक्षणचा आज म्हणजेच १० सप्टेंबर रोजी शेवट झाला. या प्रशिक्षणच्या शेवटाला दोन्ही सैन्यांनी आपली सैनिकी शक्ती आणि प्रशिक्षणाचे सादरीकरण केले. दहशतवादी गटाचा कसा सामना करावा याचे प्रत्यक्षिक दोन्ही संघांनी दाखवले. या संयुक्त प्रशिक्षणाच्या समारोपाच्या कार्यक्रमात दोन्ही देशाच्या सैन्याने आपल्या संस्कृतीचेही प्रदर्शन केले.