जो बायडेन यांच्या मुलाला ड्रग्जचे व्यसन, बंदूक बाळगण्याचा आरोप

दाखल झाला गुन्हा

जो बायडेन यांच्या मुलाला ड्रग्जचे व्यसन, बंदूक बाळगण्याचा आरोप

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन (५३) यांच्यावर अवैधरीत्या बंदूक बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑक्टोबर २०१८मध्ये बंदूक विकत घेताना त्यांनी त्यांचे अमली पदार्थांचे व्यसन दडवून ठेवले होते. तेव्हा ते कोकेन या अमली पदार्थांच्या व्यसनाच्या अधीन होते, अशी माहिती डेलाव्हेअर येथील न्यायालयापुढे सादर करण्यात आली.

व्यापाराशी संबंधित कराराप्रकरणीही हंटर बायडेन हे तपास यंत्रणांच्या रडावर आहेत. वेळेवर कर भरण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्यावर वॉशिंग्टन अथवा ते राहात असेलल्या कॅलिफोर्नियात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती हे प्रकरणा पाहणाऱ्या विशेष वकिलाने दिली.

हे ही वाचा:

पाकिस्तानचा खेळ संपला; श्रीलंका अंतिम फेरीत

आधी ‘गदर २’ पाहा तरी…दिग्दर्शकाचा नसिरुद्दीन शहा यांना सल्ला

मराठा समाजाला एकनाथ शिंदे न्याय देऊ शकतात!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे

हंटर बायडेन यांच्या व्यवसायाच्या करारांची चौकशी करावी, अशी मागणी रिपब्लिकन सदस्यांनी केली होती. तसेच, हंटर हे त्यांच्या ‘बायडेन’ या नावाचा गैरवापर करून परदेशातील विविध व्यावसायिक करार करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र या संदर्भात अध्यक्ष बायडेन यांच्या सहभागाचे कोणतेही पुरावे ते सादर करू शकले नाहीत. सन २०१७ आणि २०१८मध्ये त्यांना सुमारे १५ लाख डॉलरहून अधिक कर भरणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी ते मुद्दाम भरले नाहीत, असा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच, याच दरम्यान ते अमली पदार्थांचे सेवनही करत असत आणि अशा परिस्थितीत त्यांनी बंदूक बाळगली होती, असे दोन आरोप त्यांच्यावर आहेत.

Exit mobile version