काबुल विमानतळावर पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला

काबुल विमानतळावर पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांनी शनिवारी अफगाणिस्तानातील काबूल विमानतळावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याचा धोका बोलून दाखवला आहे. पुढच्या २४ ते ३६ तासांत काबूल विमानतळावर हल्ला होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी काबुल विमानतळावर झालेल्या दोन बॉम्ब हल्ल्यांनंतर आधीच अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. त्यात आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा धोका बोलून दाखवल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.

“अफगाणिस्तानमधील जमिनीवरची परिस्थिती अतिशय धोकादायक होत चालली आहे. विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका खूप जास्त आहे. आपल्या कमांडर्सनी अशी माहिती दिली आहे की येत्या २४ ते ३६ तासात हल्ला होण्याची खूप दाट शक्यता आहे” असे जो बाईडन यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

आम्ही भरणार नाही गणेशमंडपाचे शुल्क! वाचा, कुणी दिला इशारा…

ज्येष्ठ लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार यांचे निधन

२०५० मध्ये मुंबई बुडणार? मंत्रालय, नरिमन पॉइंट जाणार पाण्याखाली

गुरुवारी काबुल येथील हमिद कर्जाई विमानतळावर झालेल्या हल्ल्याने सारे जग हादरून गेले होते. या हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिक आणि १६९ अफगाणी नागरिक मारले गेले होते. या हल्ल्याच्या आधीही अमेरिकेकडून धोक्याचा इशारा देण्यात आला होता. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांनी विमानतळ्याच्या आवारात थांबू नये असे सांगताना दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेकडून वर्तविण्यात आली होती.

या हल्ल्या मागे आयएसआयएस असल्याचे म्हटले जात आहे. तर अमेरिकेने गुरुवारच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयएसच्या ठिकाणांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले होते. याबद्दल बोलताना जो बाईडन म्हणाले की “अमेरिकेचा हा प्रतिहल्ला शेवटचा नव्हता. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही शोधून भरपाई करण्यास भाग पाडू. अमेरिकेला इजा पोहोचण्याचा किंवा आमच्या सैनिकांवर हल्ला करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ. यात कोणतीही शंका नाही.”

Exit mobile version