अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या आज फोनवरून चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे संभाषण महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे या दोन बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संपूर्ण संघर्षात अनेक चढ-उतार होताना दिसत असले तरी आता रशियाने युक्रेनला कोड ब्लॅक स्वरूपाची वॉर्निंग दिली आहे. त्यामुळे रशिया पुढल्या काही दिवसात युक्रेनमध्ये सैन्य घुसवून शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
हे ही वाचा:
आज पडणार IPL चा हातोडा! कोण होणार मालामाल? कोणाला मिळणार ठेंगा?
मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा?
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा नवाब मालिकांना दणका
एकनाथ आव्हाडांचे ‘शब्दांची नवलाई’ बालकवी पुरस्कारने सन्मानित
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना देखील ही भीती वाटत असून त्यांनी युक्रेन मध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेत परत येण्याचे आवाहन केले आहे. अमेरिके प्रमाणेच इतरही देशांनी आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडण्याचे आणि मायदेशी परतण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध झाले तर परदेशातील नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये या दृष्टीने सर्वच देश प्रयत्नशील दिसत आहेत.
पण जर रशियाने हल्ला केला आणि ही परिस्थिती चिघळली तर २४ ते ४८ तासात अमेरिकन नागरिकांना युक्रेन मधून बाहेर काढणे कठीण होणार आहे. रशिया कोणतीही पूर्वसूचना न देता युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. त्यामुळेच या परिस्थितीत अमेरिकन नागरिक होरपळू नयेत या दृष्टीने अमेरिकेचे सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. त्यासाठीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. त्यामुळे या दोन नेत्यांच्या चर्चेतून नेमके काय निष्पन्न होणार याकडे सारे जग डोळे लावून बसले.