अखेरीस अमेरिका लस इतर राष्ट्रांना देणार

अखेरीस अमेरिका लस इतर राष्ट्रांना देणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अखेरीस सुमारे २ कोटी लसींच्या मात्रा इतर देशांना देण्यास मंजूरी दिली आहे. या मात्रा जून पर्यंत इतर देशांना देखील प्राप्त होणार आहेत. संपूर्ण कोविड काळात पहिल्यांदाच अमेरिका त्यांच्या देशांतर्गत वापरासाठी असलेल्या लसींच्या मात्रा जगाला देणार आहे.

बायडन यांनी फायझर- बायोन्टेक, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लसींना देशाबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व लसींच्या दोन कोटी मात्रांसोबतच ॲस्ट्राझेनेकाच्या तब्बल ६ कोटी मात्रा देखील इतर देशांना उपलब्ध करून देणार असल्याचे बायडन प्रशासनाकडून सांगण्यात आले. इतर लसींप्रमाणे ॲस्ट्राझेनेकाच्या लसींना अजून अमेरिकेतच देशांतर्गत वापरासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

तौक्ते वादळ सौराष्ट्रवर

इस्रोमुळे कोविडरुग्णांना प्राप्त होणार ‘श्वास’

मुंबईत अजून २४ तास पावसाची शक्यता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती

टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात रॉयटर्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार यावेळेला बायडन यांनी सांगितले की,

दुसऱ्या महायुद्धात ज्याप्रमाणे अमेरिका लोकशाही राष्ट्रांचे शस्त्रागार होती, त्याप्रमाणे कोविड विरुद्धच्या लढ्यात जगाचे लसींचे शस्त्रागार होणार आहे.

त्याबरोबरच बायडन यांनी हे देखील सांगितले की, जगातील दुसरा कोणताही देश इतक्या मोठ्या प्रमाणात लस देऊ शकणार नाही.

आत्तापर्यंत अमेरिकेने २७ कोटी २० लाख नागरिकांना लस दिली आहे. आत्तापर्यंत अमेरिकेने सुमारे ६० टक्के नागरिकांना लस दिल्यानंतर ब्राझिल आणि भारत यासारख्या कोविडच्या लाटेशी झुंजणाऱ्या देशांना लस पुरवणार आहे. यापुर्वीपासूनच अमेरिकेवर इतर देशांना देखील लस पुरवण्याचा जागतिक दबाव होता, परंतु अमेरिकेने आधी देशांतर्गत लस देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून अमेरिकेने लसराष्ट्रवाद जोपासल्याची टीका केली होती.

Exit mobile version