जितेंद्र जोशी ठरला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलचा सर्वोत्कृष्ट अभिनेता

जितेंद्र जोशी ठरला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलचा सर्वोत्कृष्ट अभिनेता

मराठी चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा सातासमुद्रापार आपला झेंडा रोवला आहे. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेता जितेंद्र जोशी याने पुरस्कार पटकावला आहे. जिओ स्टुडिओजच्या ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटासाठी अभिनेता जितेंद्र जोशी याला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

विशेष बाब म्हणजे न्यूयॉर्क इंडियन फिल्म महोत्सवात ओपनिंग फिल्म म्हणून ‘गोदावरी’ या सिनेमाची निवड करण्यात आली होती. ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, संजय मोने, नीना कुळकर्णी, गौरी नलावडे आणि प्रियदर्शन जाधव यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या असून या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे.

हे ही वाचा:

न्यूयॉर्कमध्यल्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार; १० जण ठार

‘तुम्ही वैयक्तिक टीका करता, आम्ही म्याव म्याव केलं तर चालत नाही?’

‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’

केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी

चित्रपटात जितेंद्र जोशीच्या पत्नीची भूमिका साकारणारी गौरी नलावडे हिने जितेंद्र जोशी याच्या यशाची बातमी एक पोस्ट करून दिली असून “क्षण अभिमानाचा! New York Indian Film Festival 2022 मध्ये गोदावरीसाठी जितेंद्र जोशीला ‘उत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार!” असे तिने म्हटले आहे. या नंतर जितेंद्र जोशी याचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.

Exit mobile version