भारतात जी- २० च्या होणाऱ्या परिषदेसाठी अनेक देशांचे प्रमुख देशाच्या राजधानीचे शहर दिल्लीत दाखल होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी लेडी जिल बायडेन हे दोघेही दोन दिवसांनी भारतात होणाऱ्या जी २० परिषदेत सहभागी होणार होते. मात्र, यासंबंधी मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी लेडी जिल बायडेन यांचा दोघांचा कोविड रिपोर्ट समोर आला आहे आहे. ज्यानुसार फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, जो बायडेन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. व्हाईट हाऊसने याबाबतचे अधिकृत वृत्त दिले आहे.
जिल बायडेन यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल बायडेन यांच्यात करोनाची कोणतीही लक्षणं नसून त्यांच्या रिपोर्टमध्ये मात्र त्यांना करोना असल्याचे समोर आले आहे. त्या आता डेलावेयर या ठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानीच राहणार आहेत. व्हाईट हाऊसच्या मेडिकल युनिटने त्यांच्या निकटवर्तीयांना लेडी जिल बायडेन यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळवलं आहे.
जिल बायडेन या १६ ऑगस्टला साऊथ कॅरोलिना या ठिकाणी सुट्टीसाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्यासह राष्ट्रपती जो बायडेनही उपस्थित होते. तिथे त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि जिल बायडेन या पाच दिवस क्वारंटाईन राहिल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
हे ही वाचा:
आदित्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…
गणेशोत्सवासाठी रेल्वेने पोहोचा फक्त ५० रुपयांत
खिचडी घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
राज ठाकरेंना विसर पडला,पवारांनाच मराठा आरक्षण नको होते…
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन जी २० परिषदेत सहभागी होण्यासाठी ७ सप्टेंबरला म्हणजे दोनच दिवसांनी भारतात येणार होते. मात्र त्याआधीच ही बातमी समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.